बाजारभावाने टमाटे पिकाची लागली वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 06:51 PM2019-09-18T18:51:10+5:302019-09-18T18:52:44+5:30
सायखेडा : खरीप हंगामातील सर्वात महत्वाचे नगदी पीक म्हणून ओळख असणारे टमाटे पिकाचे यंदा हंगामाच्या सुरवातीलाच बाजार भाव कमी झाल्याने अगोदर पावसाने तर आत्ता बाजारभावाच्या कारणाने टमाटे उत्पादक शेतकऱ्यांची वाट लागली असून ते चिंता ग्रस्त झाले आहेत.
सायखेडा : खरीप हंगामातील सर्वात महत्वाचे नगदी पीक म्हणून ओळख असणारे टमाटे पिकाचे यंदा हंगामाच्या सुरवातीलाच बाजार भाव कमी झाल्याने अगोदर पावसाने तर आत्ता बाजारभावाच्या कारणाने टमाटे उत्पादक शेतकऱ्यांची वाट लागली असून ते चिंता ग्रस्त झाले आहेत.
जून महिन्यात मृग नक्षत्र सुरु होताच नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पावसाला सुरवात झाली होती. त्यामुळे जूनच्या मध्यवर्ती आणि अखेरीस अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टमाटे पिकाची लागवड केली होती मशागत, मल्चिंग पेपर, रोप तार, बांबू यांचा एकरी किमान ७० ते ८० हजार रु पये खर्च करून शेतात उभ्या केलेल्या पिकाला जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसाचा फटका बसला.
जुलै आणि आॅगस्ट महिन्यात जोरदार पाऊस पडला. या दोन महिन्यात बुरशी, फळ, फुलकुज, डम्पिंग, करपा, व्हायरस अशा विविध रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होता. या काळात हजारो रु पयांची औषध फवारणी करावी लागली शिवाय अनेक शेतकºयांची हाती आलेली पिके वाया गेले. दरवर्षीच्या तुलनेत किमान २० हजार रु पये खर्च जास्त झाला त्यामुळे शेतकºयांच्या टमाटे पिकवितांना नाकी नऊ आले होते.
टमाटे पीक बहुतांशी भागात जास्त प्रमाणात पाऊस पडला असल्याने बाजारभाव चांगला मिळेल अशी अपेक्षा शेतकºयांना होती अशी शक्यता जाणकरांकडून वर्तिवली जात होती, मात्र सर्व अपेक्षा फोल ठरल्या.
हंगामाच्या सुरवातीला चारशे ते पाचशे रु पये क्र ेट भाव मिळाला होता. मात्र पंधरा ते वीस दिवसात बाजार भाव कोसळले आणि आज केवळ १०० ते २०० रु भाव वीस किलोच्या कॅरेटला मिळत आहे.
पावसाने नुकसान होवून खूपच कमी फळ झाले असल्याने उत्पादनात घट झाली आहे. त्यात भाव कमी झाल्याने शेतकºयांना खर्च वसूल होतो की नाही अशी भिती आहे.
दोन वर्षे सलग दुष्काळ होता. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले होते. यंदा चांगला पाऊस पडला होता. त्यामुळे चार पैसे पदरात पडुन डोक्यावर असलेल्या कर्जाचा डोंगर कमी होईल अशी अपेक्षा शेतकºयांना होती, मात्र पाऊस आणि बाजारभाव यांच्या जाचक अटी मधेच आल्याने कर्ज आणखी वाढले आहे.
निर्यात होत नसल्याने परिणाम
नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक टमाटे पाकिस्तान या देशात दरवर्षी निर्यात व्हायचे त्यानंतर बांगला, काठमांडू या ठिकाणी निर्यात होतात यंदा भारत व पाकिस्तान देशातील अंतर्गत संबंध बिघडलेले असल्याने पाकिस्तानमध्ये टमाटे निर्यात होत नाही. त्याचा फटका बसला आहे.
तसेच पाऊस जास्त प्रमाणात पडल्याने टमाटे दर्जेदार नाही. गुणवत्ता ढासळली आहे. अनेक औषधांचे अति प्रमाणात वापर झाल्याने फळाची चकाकी कमी झाली आहे. त्यामुळे निर्यातक्षम टमाटे नसल्याने भाव कोसल्याचे व्यापाºयांकडून बोलले जात आहे.
जून महिन्यात टमाटे पिकाची लागवड केली तर १५ आॅगस्ट दरम्यान टमाटे विक्र ीसाठी तयार होतात तेव्हा चांगला भाव मिळतो. यंदा मात्र हंगामाच्या सुरवातीलाच भाव कोसळले आहे. शिवाय जास्त प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे खर्च खूप झाला आहे. अशा भावात खर्च वसूल होणे अवघड आहे.
- संदिप सातपुते, शेतकरी.