बाजारपेठेला लग्नसराईचे वेध; उत्साहाचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:39 AM2017-10-31T00:39:23+5:302017-10-31T00:39:28+5:30
गेल्या वर्षभर नोटबंदी आणि जीएसटीमुळे निराश असलेल्या बाजारात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संचारलेले उत्साहाचे वातावरण अजूनही कायम असून, बाजारपेठेला लग्नसराईचे वेध लागले असून, सोने, कपडे, वाहन खरेदीसाठी ग्राहक गर्दी करत आहेत. यंदा १ नोव्हेंबरला तुळशीविवाह झाल्यानंतर २१ नोव्हेंबरपासून लग्नसराई सुरू होणार असून, या महिन्यात विवाह असलेल्या कुटुंबांची बाजारात खरेदीसाठी लगीनघाई सुरू झाली आहे.
नाशिक : गेल्या वर्षभर नोटबंदी आणि जीएसटीमुळे निराश असलेल्या बाजारात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संचारलेले उत्साहाचे वातावरण अजूनही कायम असून, बाजारपेठेला लग्नसराईचे वेध लागले असून, सोने, कपडे, वाहन खरेदीसाठी ग्राहक गर्दी करत आहेत. यंदा १ नोव्हेंबरला तुळशीविवाह झाल्यानंतर २१ नोव्हेंबरपासून लग्नसराई सुरू होणार असून, या महिन्यात विवाह असलेल्या कुटुंबांची बाजारात खरेदीसाठी लगीनघाई सुरू झाली आहे. यंदा तुळशीविवाहानंतर २१ नोव्हेंबरपासून विवाह मुहूर्त सुरू झालेत. त्यामुळे घोडे, बॅण्डवाले, मंगल कार्यालय, गुरुजी, केटरिंगला मागणी वाढली असून, लग्नकार्य असलेल्या कुटुंबातील कर्त्या व्यक्ती सध्या या सर्व गोष्टींची बुकिंग करण्यात व्यस्त आहेत. कापड बाजारात बस्ता घेण्यासाठी नव जीवनाची सुरु वात करणाºया वधू-वरासह त्यांचे पालक, नातेवाईक दुकानात गर्दी करीत आहेत. सराफा बाजार, भांडीबाजारातही ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. डेकोरेशनवाले, केटरर्सवाले, लग्नपात्रिक तयार करणे, इव्हेंट मॅनेजमेंटवाल्यांची लगबग सुरू झाली असून, यानिमित्ताने बाजारपेठेत कोट्यवधी रु पयांची उलाढाल होत आहे. सराफ बाजारात मंगळसूत्रांसह नेकलेस, टॉप्स, झुमके, कंबरपट्टा, अंगठी यांसह विविध प्रकारच्या दागिन्यांची मागणी वाढल्याचे सराफा व्यापाºयांनी सांगितले. तर चांदीचे जोडवे, करंडे, फणी, केळीचे पान, कारल्याचा वेल तसेच बाळकृष्ण, गिफ्ट म्हणून ताटवाटी, गुलाबदाणी आदी वस्तूंबरोबरच अलीकडे हिºयाची मागणी वाढल्याचेही व्यापारी सांगत आहेत. त्याचप्रमाणे विवाह सोहळ्यानिमित्त मुहूर्त सुरू होण्याच्या कालावधीत गुलाब, लीली, मोगरा यांसह अन्य जातींच्या फुलांना मागणी वाढणार असल्याने फूल उत्पादक शेतकरी फूलबागांकडे खास लक्ष देत आहेत.
स्टाइलसोबतच कम्फर्टेबल असावे
पारंपरिक कपडे म्हणजे केवळ भरजरी कपडे किंवा हेवी ज्वेलरी असा अर्थ होत नाही. त्याउलट जे पारंपरिक कपडे आहेत ते सर्वांत जास्त कम्फर्टेबल असले पाहिजेत. आपल्या जुन्या मुळांना धरून राहत मात्र काळाप्रमाणे बदलत पारंपरिकता जपली गेली पाहिजे. हातमागावरचे विणलेले कापड ही पारंपरिक ओळख आहे. ते वापरून लग्नाच्या वेळी ज्यात वधूला वावरायला सोपं जाईल अशी डिझाइन्स तयार होत आहेत आणि ट्रेण्डमध्ये येत आहेत. मात्र कोणत्याच नववधूने ट्रेण्ड फॉलो न करता तिचे मन आणि आवड तिला काय सांगते ते फॉलो करावे, असा सल्ला फॅशन डिझायनरकडून दिला जात आहे.
नवनवीन कलेक्शन्सकडे लक्ष
श्रावण महिन्यापासून एकामागून एक सणांचा आणि उत्सवांचा सिलिसला सुरू होतो. वर्षभरातल्या सणा-समारंभांमध्ये आणि मुख्यत: लग्नांमध्ये कोणत्या प्रकारचा ट्रेण्ड असणार आहे, कोणत्या रंगाचा प्रभाव डिझाइन्सवर असणार आहे, कोणत्या प्रकारातली पारंपरिक डिझाइन्स आणि कपड्याचा कोणता प्रकार अधिक पाहायला मिळणार आहे, या सगळ्यांचा खूप आधी अभ्यास करून सर्व फॅशन डिझायनर्स दरवर्षी आपापले ‘कलेक्शन’ आणत असतात. या वर्षीही नवनवीन कलेक्शनसाठी सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.