बाजारपेठा गर्दीने फुलल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:11 AM2021-06-29T04:11:24+5:302021-06-29T04:11:24+5:30
पंचवटी : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर प्रशासनाने नियम काही प्रमाणात शिथिल करताच पंचवटीतील विविध परिसरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी ...
पंचवटी : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर प्रशासनाने नियम काही प्रमाणात शिथिल करताच पंचवटीतील विविध परिसरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. यामुळे फिजिकल् डिस्टंसिंगचा फज्जा उडाला असून नागरिकांना कोरोनाचा विसर पडला की काय, असा प्रश्न यामुळे उपस्थित केला जात आहे.
पंचवटी परिसरात असलेल्या मालवीय चौक, पंचवटी कारंजा यासह अन्य ठिकाणी नागरिकांनी गारमेंट्स दुकान, हार्डवेअर याठिकाणी गर्दी केल्याने दुकानांत फिजिकल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे दिसून आले. रविवार कारंजा परिसरात वाहनांच्या अक्षरशः रांगा लागलेल्या होत्या. त्यात भर म्हणून मेनरोड बाजारपेठेत तर दुचाकी वाहनधारकांना वाहने लोटत न्यावी लागली. मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेनरोड परिसरातील विविध दुकाने आणि रस्ते नागरिकांच्या गर्दीने भरगच्च झाले असल्याचे बघायला मिळाले. प्रशासनाने कोरोना नियम पालन करण्याच्या सूचना दिल्या खऱ्या, मात्र सोमवारी सर्वांनाच प्रशासनाच्या नियमांचा विसर पडल्याने, कोरोना संपलाच, असा भास निर्माण झाला होता. चहा टपरी, खाद्यपदार्थ हातगाड्या, तर कुठे आईस्क्रिम विक्री दुकानात सोमवारी सकाळपासून गर्दी बघायला मिळाली.