येवल्यात महिला बचत गटांचा मेळावा मारोतीराव पवार : गटातील महिलांची परिस्थिती अद्याप जैसे थे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:15 AM2018-04-04T00:15:29+5:302018-04-04T00:15:29+5:30
येवला : या परिसरात ४० वर्षांपासून बचत गट चालू आहेत. बचत गटाच्या माध्यमातून आमपली परिस्थती बदलेले असा गटातील महिलांना विश्वास वाटतो पण परिस्थिती बदलली ती बचतगट चालवणाऱ्यांची.
येवला : या परिसरात ४० वर्षांपासून बचत गट चालू आहेत. बचत गटाच्या माध्यमातून आमपली परिस्थती बदलेले असा गटातील महिलांना विश्वास वाटतो पण परिस्थिती बदलली ती बचतगट चालवणाऱ्यांची. गटातील स्त्रिया मात्र आहे तीथेच आहेत. केवळ कागदावरच त्यांची परिस्थीती बदलली असल्याचे दिसुन येते. असे प्रतिपादन माजी आमदार मारोतीराव पवार यांनी केले. तालुक्यातील शेतकरी, शेतमजुर व स्वयंसहाय्यता महिला बचत गटास पंचायत समिती सदस्या लक्ष्मीबाई गरु ड यांच्या संकल्पनेतुन बेलस्टार इनव्हेस्टमेंट संस्थेच्या माध्यमातुन प्रत्येकी २ लाख रु पये कर्ज अदा करणे, महिला बचत गटांना स्वयंरोजगारा बद्दल मार्गदर्शन करणे यासाठी मंगळवारी (दि.३) मेळाव्याचे आयोजन शहरातील माऊली लॉन्स येथे करण्यात आले होते. याप्रसंगी पवार बोलत होते. व्यासपीठावर शिवसेनेचे संभाजी पवार, पंचायत समिती सदस्य अॅड. मंगेश भगत, अशोक मेंगाने, नवनाथ काळे, विठ्ठलराव आठशेरे, दीपक जगताप, कांतीलाल साळवे, भाऊसाहेब गरु ड, अरु ण काळे, बाळासाहेब गुंड, महेंद्र पगारे, विस्तार अधिकारी आनंद यादव उपस्थित होते. यावेळी पवार म्हणाले , पूर्वी काय झाले ते आपण आता विसरु न जाउ, मात्र पुढे काय करायला हवे, याचा विचार आता करावाच लागेल. बचत गट प्रक्रि येतून दलाल हद्दपार झाल्याचे बोलले जात असले तरी ते अर्धसत्य आहे. दलाल हद्दपार करण्यासाठी महिलांनाच सखोल अभ्यास करु न सर्व माहिती आत्मसात करावी लागणार आहे. यावेळी पंचायत समिती सभापती आशाताई साळवे, उपसभापती रु पचंद भागवत, सदस्य मोहन शेलार, प्रविण गायकवाड, भाऊसाहेब गरु ड, बचत गटाच्या सुरेखा शिंदे, मंगल जगताप, सुमित्रा बोडखे, उद्योग निरीक्षक बाळासाहेब तांबे, संजय डुंबरे, मायक्र ो फायनान्स कंपनीचे आत्माराम राठोड यांची भाषणे झाली. कार्यक्रमास तालुक्यातून अंगणवाडी सेविका, अशा कार्यकर्ती, अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन अॅड. साजिद शेख यांनी केले. तर आभार महेंद्र पगारे यांनी मानले. यावेळी संभाजीराजे मित्रमंडळाच्या वतीने उपस्थित बचतगटाच्या महिलांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.