फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 11:46 PM2020-04-26T23:46:34+5:302020-04-26T23:46:53+5:30

ओझरच्या मनीष व मनमाड येथील वैष्णवी यांनी लॉकडाउनचे सर्व नियम पाळत तसेच अवाढव्य खर्चाला फाटा देत अवघ्या सात वºहाडींच्या उपस्थितीत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत विवाह बंधनात अडकले.

Marriage in accordance with physical distance | फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत विवाह

रेशीमगाठीत बांधले गेलेले नवदांपत्य मनीष व वैष्णवी.

Next
ठळक मुद्देअक्षय्यतृतीयेचा मुहूर्त : मास्क लावून फेरे

ओझर : ओझरच्या मनीष व मनमाड येथील वैष्णवी यांनी लॉकडाउनचे सर्व नियम पाळत तसेच अवाढव्य खर्चाला फाटा देत अवघ्या सात वºहाडींच्या उपस्थितीत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत विवाह बंधनात अडकले.
जगाला आपल्या कवेत घेतलेल्या कोरोनाला व त्याचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने सर्वत्र लॉकडाउन आहे. त्यात मार्च, एप्रिल व मे च्या लग्न तारखा जमावबंदी आदेश असल्याने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्याच थाटाची चर्चा वधूवराच्या परिवारात सुरू असताना वधू-वराने व काही कुटुंबीय सदस्यांनी लग्नाचा निर्णय घेत अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त गाठला. साध्या पद्धतीने शेतात विवाह पार पडला. संचारबंदीचे पालन करून एक अनोखा विवाह संपन्न झाल्याचे पहायला मिळाले.
वैष्णवी व मनीष यांचा विवाह १५ मे रोजी ठरला होता, परंतु दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता लॉकडाउन वाढल्याने दोन्ही कुटुंबीयांनी अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त साधून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत वधू-वरांसह वºहाडींच्या तोंडाला मास्क लावून रेशीमगाठ बांधली. यावेळी दोघांचे फक्त घरातील सदस्य, मामा-मामी व गुरु यांची उपस्थिती होती.

Web Title: Marriage in accordance with physical distance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.