लग्न मांडवातच अवयवदानाचा संकल्प सोडला अन् रक्तदानही केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 08:44 PM2018-03-18T20:44:52+5:302018-03-18T20:44:52+5:30

वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने यावेळी अवयवदानाचे अर्ज भरून घेण्यात आले तसेच रक्तसंकलनही करण्यात आले.

The marriage arrangement has left the resolve of organism and blood donation | लग्न मांडवातच अवयवदानाचा संकल्प सोडला अन् रक्तदानही केले

लग्न मांडवातच अवयवदानाचा संकल्प सोडला अन् रक्तदानही केले

googlenewsNext
ठळक मुद्देरक्तदानाने सहजीवनाला प्रारंभसर्वप्रकारच्या कर्मकांडांना फाटा दिला.

नाशिक : वधू-वर शासकीय अधिकारी... मग ते लग्नही तसेच धडाकेबाज, अशी कल्पना केली जाणे स्वाभाविक आहे. शहरातही असेच एक जोडपे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विवाहबंधनात अडकले; मात्र त्यांचा विवाह हा आगळावेगळा सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारा ठरला. वधू-वरासह व-हाडी मंडळींनी लग्न मांडवातच अवयवदानाचा संकल्प सोडला अन् रक्तदान करत लग्नाचा आहेर दिला.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अभिनव विवाहाच्या निमंत्रणाची चित्रफित चांगलीच गाजली. या चित्रफितीतून भविष्यनिर्वाहनिधी विभागाचे सहायक आयुक्त वधू वर्षा पगार, तर आयकर विभागाचे सहायक आयुक्त वर स्वप्नील कोठावदे यांनी पर्यावरण, रक्तदान, अवयवदानाची शपथ घेऊया...अन् हाच असेल आमच्या लग्नाचा आहेर, असे आगळे आमंत्रणच दिले होते. या दोघा अधिकाऱ्यांचा विवाह मोठ्या उत्साहात रविवारी (दि.१८) बोधलेनगर परिसरातील एका लॉन्समध्ये पार पडला.
दरम्यान, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हे जोडपे विवाहबद्ध झाले. नव वधू-वर यांनीही अवयवदानाचा अर्ज भरत रक्तदान के ले. तसेच विवाहासाठी जमलेल्या व-हाडींपैकी अनेकांनी अवयवदानाचा संकल्प सोडत अर्जही भरले. यावेळी बहुतांश पाहुण्यांनी विवाह मांडवातच रक्तदान करत वधू-वरांच्या सामाजिक बांधिलकीच्या हाकेला प्रतिसाद दिला. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने यावेळी अवयवदानाचे अर्ज भरून घेण्यात आले तसेच रक्तसंकलनही करण्यात आले.

रक्तदानाने सहजीवनाला प्रारंभ
विवाहचे मंगलाष्टकपूर्वी रक्तदान करून या अधिकारी जोडप्यांनी सहजीवनाची आगळीवेगळी सुरुवात केली. सामाजिक बांधिलकीची जोपासना करण्याचा प्रयत्न या विवाहाच्या माध्यमातून करण्याचा हा पायंडा त्यांनी एकप्रकारे समाजापुढे ठेवत ‘आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं काही देणं लागतो’ ही आठवण करून दिली. एवढेच नव्हे तर जोडीदार निवडीप्रसंगी कुठल्याही अंधश्रद्धेचा बळी न ठरता सत्यशोधक पद्धतीने एकमेकांचे जीवनसाथी बनण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सर्वप्रकारच्या कर्मकांडांना फाटा दिला.

Web Title: The marriage arrangement has left the resolve of organism and blood donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.