लॉन्सजवळ विवाहितेचा विनयभंग
By admin | Published: April 21, 2017 07:13 PM2017-04-21T19:13:18+5:302017-04-21T19:13:18+5:30
लॉन्सजवळ विवाहितेचा विनयभंग
Next
नाशिक : पतीसोबत का राहत नाही अशी विचारणा करून विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना पेठरोडवरील पवार लॉन्सजवळ रविवारी (दि़२०) घडली़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरटीओ कॉर्नर परिसरातील विवाहित महिला पवार लॉन्सजवळ मैत्रिणीसमवेत बोलत उभी होती़ त्यावेळी तिथे आलेल्या संशयित रवि खांडरे (रा.शांतीनगर,दिंडोरी रोड, नाशिक) याने तू नवऱ्यासोबत का राहत नाही असे म्हणून शिवीगाळ केली़ दरम्यान, महिलेने तुझा माझ्या प्रकरणाशी काय संबंध, अशी विचारणा केली असता खांडरे याने विनयभंग केल्याचे विवाहितेने फिर्यादित म्हटले आहे.
याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)