व्यवसायाकरिता पैसे आणत नसल्याने विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 05:06 PM2018-11-25T17:06:13+5:302018-11-25T17:06:47+5:30

नाशिक : पतीच्या व्यवसायासाठी माहेरून पैसे आणत नाही, या कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिच्या वडिलांच्या दुचाकीची तोडफोड केल्याची फिर्याद पीडित विवाहितेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात दिली आहे़

Marriage persecution because of not bringing money for business | व्यवसायाकरिता पैसे आणत नसल्याने विवाहितेचा छळ

व्यवसायाकरिता पैसे आणत नसल्याने विवाहितेचा छळ

Next
ठळक मुद्देविवाहिता छळाचा गुन्हा

नाशिक : पतीच्या व्यवसायासाठी माहेरून पैसे आणत नाही, या कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिच्या वडिलांच्या दुचाकीची तोडफोड केल्याची फिर्याद पीडित विवाहितेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात दिली आहे़

कल्पना विलास पाथरे (३४, रा़ तक्षशिला विद्यालयासमोर, देवळालीगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पतीच्या व्यवसायासाठी माहेरून पैसे आणत नाही, या कारणावरून पती दीपक पाथरे, संजय पाथरे (जेठ), जयश्री पाथरे, दिलीप पाथरे (दीर), अनिता आहेर (नणंद), मधुकर आहेर (नंदोई) व भाचा हेमंत तेली (सर्व राहणार गोरेवाडी, मारुती मंदिराजवळ, जेलरोड) यांनी ५ मे २०११ ते २४ नोव्हेंबर २०११ या कालावधित वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला़ तसेच पती दीपक पाथरे याने विवाहितेच्या वडिलांच्या दुचाकीची (एमएच १५, डीएफ ३८९२) तोडफोड केली. तसेच घराच्या काचा फोडून मोठे नुकसान केले़

या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात विवाहिता छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Marriage persecution because of not bringing money for business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.