आॅगस्टपासून विवाह नोंदणी आॅनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:10 AM2018-07-12T00:10:55+5:302018-07-12T00:11:23+5:30
नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांना यापुढे दुय्यम निबंधक तथा विवाह अधिका-यांकडे जाण्याची गरज नसून, यासाठी संबंधित विभागाने संकेतस्थळ सुरू केले असून, विवाह इच्छुक वर-वधू आता घरबसल्या आॅनलाइन प्रणालीचा वापर करून विवाहापूर्वीची नोटीस प्रसिद्ध करू शकतील व १ आॅगस्टपासून प्रत्येकाला यापुढे विवाहाची नोटीस आॅनलाइन देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
नाशिक : नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांना यापुढे दुय्यम निबंधक तथा विवाह अधिका-यांकडे जाण्याची गरज नसून, यासाठी संबंधित विभागाने संकेतस्थळ सुरू केले असून, विवाह इच्छुक वर-वधू आता घरबसल्या आॅनलाइन प्रणालीचा वापर करून विवाहापूर्वीची नोटीस प्रसिद्ध करू शकतील व १ आॅगस्टपासून प्रत्येकाला यापुढे विवाहाची नोटीस आॅनलाइन देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
नोंदणी पद्धतीने विवाह करणाºयासाठी इच्छुकवर, वधूंना आपल्या नियोजित विवाहाची नोटीस, वय व रहिवास पुराव्याच्या कागदपत्रांसह संबंधित जिल्ह्याच्या विवाह अधिकाºयांना सादर करून त्याबाबतच्या नोटिसीचे शासकीय शुल्क भरावे लागते. विवाह अधिकारी सदर विवाहाच्या नोटिसीची प्रत फलकावर लावून ३० दिवसांत विवाहाबाबत कोणाची हरकत असल्याची खात्री करतात व त्यानंतरच्या ६० दिवसांत वर-वधू ३ साक्षीदारांसमक्ष विवाह अधिकाºयासमोर विवाहासाठी उपस्थित राहून प्रमाणपत्र घेतात. प्रत्येक जिल्ह्यात दुय्यम निबंधकांना विवाह नोंदणी अधिकारी म्हणून दर्जा देण्यात आला असून, मुद्रांक नोंदणी विभागाने यासाठी आता विवाह नोंदणी प्रक्रियेचे संगणकीकरण केले असून, त्यासाठी राज्यातील सर्व विवाह नोंदणी अधिकाºयांची कार्यालये मध्यवर्ती सर्व्हरशी जोडण्यात आले आहेत. विवाह अधिकारी कार्यालयात आल्यानंतर डेटा एंट्री करण्यासाठी पक्षकारांचा वेळ जाऊ नये म्हणून नागरिकांना आता त्यांची नोंदणी करण्याची सुविधा देण्यासाठी मुद्रांक नोंदणी विभागाने संकेतस्थळावर सोय करून दिली आहे.
आॅनलाइनच ग्राह्य
आता इच्छुक वर, वधूंना विवाहाची नोटीस देण्यासाठी विवाह अधिकाºयाकडे जाण्याची गरज नसून कोणत्याही ठिकाणाहून संकेतस्थळावरून विवाह नोंदणीची नोटीस आॅनलाइन देता येणार आहे. १ आॅगस्टपासून विवाह नोंदणीची नोटीस आॅनलाइनच देण्याचे बंधनकारक करण्यात येत असल्याचे मुद्रांक नोंदणी विभागाने जाहीर केले आहे.