लग्नसराई, सुट्यांमुळे बसेस झाल्या फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 12:20 AM2018-05-05T00:20:01+5:302018-05-05T00:20:01+5:30
सिन्नर : उन्हाळ्याच्या सुट्या व दाट लग्नतिथीमुळे प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्व मार्गावर धावणाऱ्या बस फुल्ल झाल्या असल्याचे चित्र आहे.
सिन्नर : उन्हाळ्याच्या सुट्या व दाट लग्नतिथीमुळे प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्व मार्गावर धावणाऱ्या बस फुल्ल झाल्या असल्याचे चित्र आहे. प्रत्येक बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. नियमित प्रवास करणाºया प्रवाशांसह उन्हाळी सुट्या व नात्यागोत्यातील लग्न समारंभाला हजेरी लावण्यासाठी बसने प्रवास करावा लागत असल्याने बसवर अतिरिक्त प्रवाशांचा ताण पडला आहे. राज्य परिवहन मंडळाच्या बसेस फुल्ल झाल्याने प्रवाशांना सुमारे तीस-चाळीस किलोमीटरचा प्रवास केवळ उभे राहून करण्याची वेळ आली आहे. प्रवाशांच्या गर्दीने वाहकांचा उर्मटपणाही वाढला असल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे. सुटे पैशावरून प्रवाशांना वाहकाकडून त्रास होत आहे. सुटे पैसे असतील तर गाडीत बसा अन्यथा उतरून घ्या, अशा भाषेत काही वाहक प्रवाशांची वागत असल्याची तक्रार केली जात आहे. बसमध्ये जागा मिळत नसल्याने लांबपल्ल्याचा प्रवास करण्यासाठी अनेक प्रवासी खासगी बस, प्रवासी वाहनांना पसंती देत आहे.