धांद्री येथे विवाहितेची आत्महत्या

By Admin | Published: May 27, 2017 11:37 PM2017-05-27T23:37:23+5:302017-05-27T23:37:49+5:30

सटाणा : माहेरून सात लाख रुपये आणले नाहीत म्हणून सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या जाचास कंटाळून बागलाण तालुक्यातील धांद्री येथील सत्तावीस वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

Marriage suicide in Dhandri | धांद्री येथे विवाहितेची आत्महत्या

धांद्री येथे विवाहितेची आत्महत्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : शेतजमीन घेण्यासाठी माहेरून सात लाख रुपये आणले नाहीत म्हणून सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या जाचास कंटाळून बागलाण तालुक्यातील धांद्री येथील सत्तावीस वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी सासू, पतीसह चौघांविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे. निफाड तालुक्यातील रामनगर (सायखेडा) येथील लाइनमन शिवगीर तुळशीराम गोसावी यांनी मुलगी शीतल हिचा विवाह नऊ वर्षांपूर्वी बागलाण तालुक्यातील धांद्री येथील केदा त्र्यंबक गोसावी याच्याशी रीतीरिवाजाप्रमाणे लावून दिला होता. चार वर्षं सुखाने संसार सुरू होता. शीतलला प्रथमेश, दर्शन हे दोन मुले झाल्यानंतर तिचा रिक्षा घेण्यासाठी सासरच्या मंडळींनी छळ करण्यास सुरुवात केली. शीतलचे पिता शिवगीर यांनी सासरच्या मंडळींची ही मागणी पूर्ण केली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी या छळाला कंटाळून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु शेजारील नातेवाईक राकेश गोसावी यांनी तिचा बचाव केला.  या प्रकारामुळे शीतलचे पिता शिवगीर यांनी सासरच्या मंडळीची भेट घेऊन काही दिवस व्यवहार थांबवून घ्या पैसे उपलब्ध झाल्यावर व्यवहार पूर्ण करू असे सांगून समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या शुक्रवारी रात्री सासरच्या जाचाला कंटाळून घराजवळील विहिरीत उडी घेऊन शीतलने जीवन यात्रा संपविली. हा प्रकार मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी सटाणा पोलिसांनी सासरकडील चौघांविरुद्ध भादंवि कलम ४९८ (अ), ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन मगर करीत आहेत.

Web Title: Marriage suicide in Dhandri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.