सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेचा आत्महत्त्येचा प्रयत्न
By admin | Published: September 17, 2015 10:53 PM2015-09-17T22:53:31+5:302015-09-17T22:54:12+5:30
घोटी : फिर्याद घेण्यास नकार दिल्याने संताप
घोटी : बेपत्ता पतीचा शोध लागावा यासाठी मोठ्या अपेक्षेने घोटी पोलीस
ठाण्यात गेलेल्या एका विवाहित महिलेची पोलिसांनी दखल न घेता तिला हाकलून दिल्याने व्यथित झालेल्या या विवाहितेने विषारी औषध घेऊन आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला.
विषारी औषध प्राशन करून ही विवाहिता थेट जिल्हा पोलीसप्रमुख कार्यालयात हजर होऊन तिने
आपली व्यथा मांडली. अखेर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सदर महिलेला पोलिसांनी प्रथम जिल्हा रु ग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान या घटनेमुळे घोटी पोलिसांच्या कर्तृत्वाचा आणि कार्यप्रणालीचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
घोटी शहरातील एका भंगार व्यावसायिकाने आंतरजातीय विवाह करून एका मुलीशी विवाह केला आहे. विवाहानंतर ही मुलगी सासरी आली असताना सासरची मंडळी तिचा शारीरिक व मानसिक छळ करू लागले.
याबाबत तिने पोलीस स्टेशन गाठून आपली व्यथा मांडली होती. मात्र आपला पती गेली काही दिवसांपासून घरी आला नाही त्याचा शोध घ्यावा यासाठी काल नफीसा अफझल शेख (२५) ही महिला दुपारच्या सुमारास घोटी पोलीस ठाण्यात तक्र ार देण्यासाठी आली होती. मात्र कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने या महिलेची दखल न घेता उलट तिला पोलीस स्टेशन बाहेर काढून दिले.
दरम्यान, आपली व्यथा पोलीस समजून घेत नाही व आपल्याला न्याय देत नाही म्हणून व्यथित झालेल्या या विवाहितेने काल संध्याकाळी विषारी औषध प्राशन करून जिल्हा पोलीसप्रमुखांचे कार्यालय गाठले. तेथील पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सदर विवाहितेला उपचारासाठी जिल्हा रु ग्णालयात दाखल केले. (वार्ताहर)