दोन्ही मुली झाल्याने विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:23 PM2019-03-19T23:23:50+5:302019-03-20T01:03:10+5:30
लग्नात हुंडा दिला नाही, तसेच सासरकडच्या पाहुणे मंडळींचा नीटनेटका पाहुणचार केला नाही आणि लग्नानंतर दोन्हीही मुलीच झाल्या या कारणावरून कुरापत काढून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील सांगवी येथे राहणाऱ्या पतीसह पाच जणांवर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटी : लग्नात हुंडा दिला नाही, तसेच सासरकडच्या पाहुणे मंडळींचा नीटनेटका पाहुणचार केला नाही आणि लग्नानंतर दोन्हीही मुलीच झाल्या या कारणावरून कुरापत काढून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील सांगवी येथे राहणाऱ्या पतीसह पाच जणांवर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जत्रा हॉटेलमागे असलेल्या वृंदावननगर येथे राहणाऱ्या गायत्री अण्णासाहेब बंदरे या विवाहितेने आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गायत्री बंदरे यांचा सात वर्षांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील सांगवी येथे राहणाºया अण्णासाहेब बंदरे याच्या समवेत विवाह झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी पती अण्णासाहेब सखाहरी बंदरे, सखाहरी बंदरे (सासरे), वत्सलाबाई बंदरे (सासू), संदीप बंदरे (दीर), प्रियंका बंदरे (जाऊ) आदींनी स्वयंपाक नीट येत नाही, लग्नात आलेल्या पाहुण्यांना मानपान दिला नाही, तसेच हुंडा दिला नाही व घरात नीट काम करता येत नाही आणि दोन्ही मुलीच झाल्या या कारणावरून अनेक वेळा कुरापत काढून शारीरिक व मानसिक छळ केला. याशिवाय माहेरून ५० हजार रुपये आणण्याची मागणीही केली.
सासरच्या मंडळींकडून वारंवार होणाºया छळाला कंटाळून गायत्री हिने आडगाव पोलीस ठाणे गाठत सासरच्या होणाºया छळाबाबत तक्रार दाखल करण्यात आली़