विवाहितेचा छळ: पतीसह सासरच्या तिघांना सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 11:43 PM2019-02-26T23:43:56+5:302019-02-27T00:31:07+5:30

माहेरून पैसे आणले नाही या कारणावरून पतीसह सासरच्यांनी विवाहितेचा छळ केला. या छळाला कंटाळून सुरगाणा येथे एका विवाहितेने जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना घडली होती.

Married to Married | विवाहितेचा छळ: पतीसह सासरच्या तिघांना सक्तमजुरी

विवाहितेचा छळ: पतीसह सासरच्या तिघांना सक्तमजुरी

Next

नाशिक : माहेरून पैसे आणले नाही या कारणावरून पतीसह सासरच्यांनी विवाहितेचा छळ केला. या छळाला कंटाळून सुरगाणा येथे एका विवाहितेने जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना घडली होती. या गुन्ह्यात जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी (दि.२६) विवाहितेच्या पतीसह सासरच्या तिघांना दोषी धरत सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
हेमलता नरेंद्र जाधव (२३) हिचा नरेंद्रसोबत विवाह झाला होता. विवाहानंतर पती नरेंद्र व सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. हुंड्यात मागितलेली रक्कम तसेच वाहन घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा विवाहितेकडे लावला होता. पैसे न दिल्याने आरोपींनी हेमलताला घराबाहेर काढले होते.
सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. कल्पक निंबाळकर यांनी साक्षीदार तपासले असता न्यायालयाने पती नरेंद्र सखाराम जाधव यासह सासरच्या तिघांना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. त्यात पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सात वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रु पये दंड ठोठावला, तर उर्वरित सखाराम महादू जाधव, गोदाबाई उर्फ यशोदा सखाराम जाधव आणि मंजुळा हरी गायकवाड या तिघा आरोपींना प्रत्येकी तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रु पये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
पेठ पोलीस ठाण्यात दाखल केला होता गुन्हा
सतत होणाऱ्या शारीरिक व मानिसक छळाला कंटाळून हेमलता हिने २०१७साली माहेरी येऊन स्वत:ला पेटवून घेत आत्महत्त्या केली होती. याप्रकरणी हेमलतच्या पतीसह सासरच्या लोकांविरोधात पेठ पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Married to Married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.