विवाहितेची आत्महत्या; पती, सासूवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 01:14 AM2019-03-31T01:14:43+5:302019-03-31T01:15:37+5:30
आडगाव शिवारातील शमदीप रो-हाउस येथे राहणाऱ्या विवाहिता पूनम ज्ञानेश्वर गवांदे हिने आत्महत्या केल्याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात पती व सासू यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटी : आडगाव शिवारातील शमदीप रो-हाउस येथे राहणाऱ्या विवाहिता पूनम ज्ञानेश्वर गवांदे हिने आत्महत्या केल्याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात पती व सासू यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या गुरुवारी (दि.२८) २७ वर्षीय पूनम गवांदे हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत सुरुवातीला आडगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
याबाबत काल मयताचे वडील दिलीप सोनबा कोल्हे (रा. फलटण, जि. सातारा) यांनी आडगाव पोलीस ठाण्यात आत्मत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मयत पूनम हिस लग्न झाल्यापासून अवघ्या महिन्याभरानंतर सासू निर्मला व जावई ज्ञानेश्वर यांनी लग्नात भांडी घेण्यासाठी कमी पैसे दिले अजून पैसे द्यायला पाहिजे होते असे म्हणून वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला. वारंवार होणाऱ्या या छळाला कंटाळून दोन दिवसांपूर्वी पूनम हिने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक दिनेश मुळे तपास करीत आहेत.