मार्क्सवादी पक्ष लढविणार ४८ जागा

By admin | Published: November 14, 2016 01:00 AM2016-11-14T01:00:10+5:302016-11-14T01:11:28+5:30

घोषणा : इतर पक्ष उमेदवारांच्या शोधात

Marxist party will fight 48 seats | मार्क्सवादी पक्ष लढविणार ४८ जागा

मार्क्सवादी पक्ष लढविणार ४८ जागा

Next

सातपूर : महानगरपालिका निवडणुकीत राजकीय पक्षांना मागे टाकत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने उमेदवारांची घोषणा केली आहे.
महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. काही विद्यमान नगरसेवक आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. अशा पक्षांतर करणाऱ्यांना उमेदवारी मिळेल की नाही याची आज तरी शाश्वती नाही. शिवाय राजकीय पक्षांनीदेखील अजून तरी संभाव्य उमेदवारांचा विचार केलेला दिसत नाही. इच्छुक उमेदवार मात्र परस्पर निवडणुकीच्या व्यूहरचनेत मश्गूल झाले आहेत. निवडणुकीत युती अथवा आघाडी होईल की नाही, असा गंभीर विचार इच्छुक उमेदवार करीत आहेत.
दरम्यान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकपा) राज्य महासचिव माजी आमदार नरसय्या आडम यांनी नाशिकला येऊन निवडणुकीचा आढावा घेतला. संभाव्य परिस्थिती जाणून घेत त्यांनी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. शिवाय १२ प्रभागात ४८ उमेदवार निवडणूक लढविणार असल्याचे सांगून काही उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आघाडी घेतली आहे. उमेदवार निश्चित केल्याने हे उमेदवार आतापासूनच प्रचाराच्या कामाला लागणार आहेत. (वार्ताहर)

Web Title: Marxist party will fight 48 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.