मराठा विद्यार्थी वसतिगृहासाठी ‘मेरी’ची जागा हस्तांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 01:19 AM2018-08-11T01:19:34+5:302018-08-11T01:19:42+5:30
नाशिक : मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जलसंपदा विभागाच्या महाराष्टÑ अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच ‘मेरी’च्या ताब्यात असलेल्या दोन इमारती मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी देण्याचे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी मुंबईत दिले. या इमारती सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हस्तांतरित करून, त्यांची डागडुजी व दुरुस्ती करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत या वसतिगृहात प्रवेशासाठी शासन निर्णयानुसार प्रक्रिया राबविण्यात येणार असून, त्यासाठी शासकीय इमारतीचा शोध सुरू असताना नाशिकच्या मेरी संस्थेतील वसाहतीमधील क्रमांक ११८ मधील विनावापर असलेल्या सी टाईप १० आणि ११ क्रमांकाच्या इमारती तात्पुरत्या स्वरूपात वसतिगृहासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला हस्तांतरण करण्यात आल्या आहेत. या संदर्भात तंत्र शिक्षण विभागाने वसतिगृहासाठी दोन इमारती तात्पुरत्या स्वरूपात मिळाव्यात, अशी मागणी केली होती. या इमारती अनेक वर्षांपासून रिक्त होत्या, त्यामुळे त्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्णांत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने सुसज्ज वसतिगृहे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यात विद्यार्थ्यांना राहण्यासाठी उत्तम शैक्षणिक वातावरण तयार व्हावे यासाठी स्वच्छता, इमारतीत सीसीटीव्ही, गरम पाण्याची सुविधा, सुरक्षा, परिसरच्या सुशोभिकरणासाठी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र व्यवस्था असेल अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.