आदर्श शिक्षक समितीकडून मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 08:57 PM2020-05-06T20:57:49+5:302020-05-06T23:42:06+5:30

सिन्नर : सॅनिटायझर आणि मास्क वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी सर्व आरोग्य कर्मचारी, पोलीस, शिक्षक यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

Mask from Adarsh Shikshak Samiti | आदर्श शिक्षक समितीकडून मास्क

आदर्श शिक्षक समितीकडून मास्क

Next

सिन्नर : आदर्श शिक्षक समिती नाशिक तसेच तालुका शाखा सिन्नर यांच्या माध्यमातून कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर सिन्नर पोलीस स्टेशन, दोडी प्राथमिक आरोग्य केंद्र, कोरोना चेकपोस्ट नांदूरशिंगोटे, वावी पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र वावी आणि कोरोना चेक पोस्ट पाथरे याठिकाणी कार्यरत असणाऱ्या सर्व पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, पोलीसमित्र, शिक्षक यांच्या आरोग्याची सुरक्षितता राखावी म्हणून
सॅनिटायझर आणि मास्क वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी सर्व आरोग्य कर्मचारी, पोलीस, शिक्षक यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष रामदास सांगळे, मुक्ता पवार, साने गुरुजी पतसंस्थेचे चेअरमन रामदास घुगे, जिल्हा चिटणीस मारुती आंधळे, तालुका सरचिटणीस रवींद्र सातव, कोषाध्यक्ष सोमनाथ पथवे, प्रसिद्धीप्रमुख संदीप लेंडे, ज्ञानेश्वर केदार, अरु ण आव्हाड, महेश पाबळे, गजानन ठोंबरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Mask from Adarsh Shikshak Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक