मालेगावात कोरोनात मास्क विक्री जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:10 AM2021-03-30T04:10:54+5:302021-03-30T04:10:54+5:30

शहरात कोरोना नागरिकांना अंगवळणी झाला आहे. त्यापासून चार हात दूर राहण्याचे सर्वप्रकारच्या खबरदारी नागरिक घेत आहेत. या कोरोनामुळे अनेक ...

Mask sales in Corona in Malegaon boom | मालेगावात कोरोनात मास्क विक्री जोरात

मालेगावात कोरोनात मास्क विक्री जोरात

Next

शहरात कोरोना नागरिकांना अंगवळणी झाला आहे. त्यापासून चार हात दूर राहण्याचे सर्वप्रकारच्या खबरदारी नागरिक घेत आहेत. या कोरोनामुळे अनेक लहान व्यावसायिक हतबल झाले आहेत. आपले पारंपरिक व्यवसाय बदलून इतर कामे व्यवसाय बदल करून संसाराचा गाडा सुरू ठेवला आहे. या व्यवसायाव्यतिरिक्त अनेकांना मास्क विक्रीचा नवीन व्यवसाय सापडला आहे. शहरात किदवाई रोड, गूळ बाजार, संगमेश्वर, कॅम्प रस्ता, सटाणा रोड, नाका, मालेगाव कॅम्प व इतर अनेक ठिकाणी मास्क विक्री सुरू आहे. आपल्या पारंपरिक व्यवसायासोबत येथे मास्क विक्री होत आहे. याशिवाय अनेक नामांकित तयार कापड दुकाने, शोरूम, माॅल्समध्ये आवर्जुन मास्क विक्रीसाठी ठेवले आहे तर मेडिकल दुकानांवरदेखील मोठ्या प्रमाणावर मास्क विक्रीसाठी उपलब्ध आहे. अगदी तीन रुपयांपासून ते पन्नास, शंभर रुपयांत वेगवेगळ्या प्रकारचे, डिझाईन, मॅचिंग असलेले मास्क उपलब्ध झाले आहेत. हे मास्क सध्या मुंबई, नाशिक खरेदी केली जात असून काही प्रमाणात मालेगावातून मागणीप्रमाणे मास्क बनवून घेत असल्याचे एका विक्रेत्यांनी सांगितले. मास्क हे कोरोना संसर्गजन्य आजारांत प्रभावी अस्र ठरले असल्याने त्यांची मोठी मागणी सर्वत्र होत आहे. शहरात कोरोनामुळे अनेक व्यवसाय कोलमडल्याने अनेकांनी भाजीपाला विक्री, फळांची दुकाने, रस्त्यावर चालले फिरते हाॅटेल, चहा-विक्री दुकाने सुरू केली आहे तर अनेकांनी मास्क विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. या नवीन व्यवसायामुळे काहीतरी रोजंदारी मिळून आर्थिक हातभार लागत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले तर शहरात अनेक ठिकाणी अनेक रंगांचे, रंगबिरंगी, वेगवेगळ्या प्रकारचे मास्क पाहून याबाबत चर्चा सुरू आहे.

Web Title: Mask sales in Corona in Malegaon boom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.