कळवण रोटरीकडून सफाई कामगारांना मास्क,सॅनिटायझर,हँन्डग्लोव्हजचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 04:24 PM2020-03-31T16:24:25+5:302020-03-31T16:25:08+5:30
कळवण : कोरोना विषाणू भारतात वेगाने पसरत आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रात जास्त प्रमाणात दिसत आहे. या जीवघेण्या विषाणूचा प्रसार एक दुसऱ्यांच्या संपर्कात आल्याने मोठयÞा प्रमाणात होत आहे. वेगाने संक्र मण होणार्या कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी रोटरी क्लब आॅफ कळवणच्या वतीने कळवण नगरपंचायतच्या सफाई कर्मचार्यांना मास्क, सनिटायझर, हॅण्ड ग्लोज इत्यादी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी डा.समाधान सोनवणे यांनी कर्मचार्यांना सोशल डिस्टन्स व स्वत:ची काळजी घेण्यासंबंधीच्या उपाययोजना यासंबंधी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी गटनेते कौतिक पगार नगरपंचायतचे मुख्याधिकारी सचिन माने, रोटरीचे अध्यक्ष प्रा. रवींद्र पगार, सेक्र ेटरी राजेश मुसळे, माजी अिसस्टंट गव्हर्नर विलास शिरोरे, अिसस्टंट गव्हर्नर जितेंद्र कापडणे व सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते.