मास्कची दुकाने दिवसभर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:11 AM2021-05-28T04:11:59+5:302021-05-28T04:11:59+5:30
शहरातील सिग्नल्स पुन्हा झाले सुरू नाशिक : जिल्ह्यात बारा दिवसांचा लाॅकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर रस्त्यावरील सिग्नल यंत्रणाही बंद ...
शहरातील सिग्नल्स पुन्हा झाले सुरू
नाशिक : जिल्ह्यात बारा दिवसांचा लाॅकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर रस्त्यावरील सिग्नल यंत्रणाही बंद करण्यात आली होती. सोमवार, दि. २४ पासून लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतरही सिग्नल यंत्रणा सुरू झालेली नव्हती. गेल्या दोन दिवसांपासून सिग्नल्स पूर्ववत सुरू झाले आहेत.
टाकळी रस्त्याचे डांबरीकरण सुरू
नाशिक : आगरटाकळी येथील रस्त्याचे डांबरीकरण सुरू झाल्याने या मार्गाला झळाळी प्राप्त झाली आहे. मागील महिन्यात या मार्गावर दुभाजक टाकण्यात आल्यामुळे रस्त्याचे सौंदर्य वाढले होते. आता डांबरीकरण करण्यात येत असल्याने रस्ता अधिक भव्य झाला असून, वाहनधारकांनीही समाधान व्यक्त केले आहे.
इंदिरा गांधी चौकात एकेरी वाहतूक
नाशिक : जेल रोड लेाखंडे मळ्याकडून जाणारा रस्ता बांबू टाकून बंद करण्यात आला आहे, तर दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर या लोखंडे मळा तसेच टाकळीकडे जाणाऱ्या मार्गावर इंदिरा गांधी चौकात बॅरिकेडस् टाकण्यात आले होते. आता टाकळी मार्ग मोकळा करण्यात आला आहे.
रुग्णालयांमध्ये जागा असल्याने दिलासा
नाशिक : कोरोनाच्या कालावधीत शहरातील कोविड रुग्णालयांमध्ये बेड तसेच ऑक्सिजन नसल्याने अनेक रुग्णांवर वेेळेत उपचार होऊ शकले नाही. त्यामुळे अनेकांच्या जीवावर देखील बेतले. आता मात्र परिस्थिती नियंत्रणात आल्याने रुग्णालयांमध्ये जागा उपलब्ध होत असल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे.
भाजी बाजारात आवक वाढली
नाशिक : लॉकडाऊननंतर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्याने किरकोळ बाजारातील भाज्यांचे दरदेखील काही प्रमाणात नियंत्रणात आले आहेत. बटाट्याचे भाव मात्र कमी झाले नसून ३० रुपये प्रतिकिलो बटाट्याची विक्री केली जात आहे.