‘स्मार्टरोड’विरुद्ध जनक्षोभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 01:19 AM2018-11-28T01:19:58+5:302018-11-28T01:20:16+5:30

व्यवसाय कसा करायचा? आम्ही ये-जा कोठून व कशी करायची? पर्यायी रस्त्याची व्यवस्था करा अन्यथा ठिय्या मांडल्याशिवाय राहणार नाही, असा आक्रमक पवित्रा अशोकस्तंभावरील रहिवाशी व व्यावसायिकांनी घेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

 The massacre against 'smartterode' | ‘स्मार्टरोड’विरुद्ध जनक्षोभ

‘स्मार्टरोड’विरुद्ध जनक्षोभ

googlenewsNext

नाशिक : व्यवसाय कसा करायचा? आम्ही ये-जा कोठून व कशी करायची? पर्यायी रस्त्याची व्यवस्था करा अन्यथा ठिय्या मांडल्याशिवाय राहणार नाही, असा आक्रमक पवित्रा अशोकस्तंभावरील रहिवाशी व व्यावसायिकांनी घेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थाची भूमिका पार पाडून नागरिकांना शांत केले. संबंधितांनी तत्काळ दुभाजक फोडून पर्यायी रस्त्याची व्यवस्था ये-जा करण्यासाठी करून दिली.
मेहेर चौक ते सीबीएसपर्यंतच्या रस्त्याचे विकासाचे काम मागील तीन ते चार महिन्यांपासून सुरू आहे. आता त्यापुढील टप्प्यात सीबीएस ते त्र्यंबकनाका आणि मेहेर ते अशोक स्तंभपर्यंतचा रस्ता विकासकामाला प्रारंभ करण्यात आला आहे. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आल्याचे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने जाहीर केले आहे. त्यानुसार अंमलबजावणी सुरू झाली आहे.
अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल येथून मुंबईनाक्याकडे जाण्यास मज्जाव करण्यात आला असून हा रस्ता एकेरी करण्यात आला आहे.
त्यामुळे नागरिकांना पर्यायी रस्त्यांचा वापर करत वळसा घेऊन मार्गस्थ व्हावे लागत आहे.
दरम्यान, स्तंभावरील रहिवाशांच्या सोसायट्यांसह व्यावसायिक कॉम्पलेक्समधील नागरिकांना ये-जा करण्यासाठी वाट बंद झाल्याने दैनंदिन कामासाठी कोठून व कसे बाहेर पडावे? हा यक्ष प्रश्न निर्माण झाला होता.
त्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त केला जात होता.
वाहतूक शाखेने घेतला धडा
सोमवारी एकेरी वाहतुकीच्या अंमलबजावणीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा उडालेला बोजवारा आणि फसलेल्या नियोजनातून मंगळवारी वाहतूक नियंत्रण शाखेने धडा घेतल्याचे चित्र पहावयास मिळाले. यामुळे नागरिकांनी काही प्रमाणात समाधान व्यक्त केले. सुमारे ४०हून अधिक पोलीस कर्मचारी पर्यायी मार्गावरील मुख्य चौकांमध्ये तसेच एकेरी मार्गावर तैनात करण्यात आले होते.
दोन दिवसांपासून नागरिकांकडून संबंधित लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाकडे याबाबत पाठपुरावा केला जात होता; मात्र त्याचा कुठलाही उपयोग झाला नाही. परिणामी नागरिकांच्या संतापाचा मंगळवारी (दि.२७) उद्रेक झाला. दुपारच्या सुमारास नागरिक व व्यावसायिकांनी कामबंद आंदोलन करण्याचा पवित्रा घेत महापालिकेच्या अधिकाºयांसह ठेकेदाराच्या कर्मचाºयांना धारेवर धरले.
जोपर्यंत पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत ठिय्या देण्याची
भूमिका संतप्त नागरिकांनी घेतल्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
अखेर पालिका प्रशासनाने एक पाऊल मागे येत रस्ता खोदकाम करताना काही फूट जागा सोडून दिली तसेच त्या जागेनुसार तेवढ्या फुटापर्यंत दुभाजक तोडून वाट तयार करून दिली.

Web Title:  The massacre against 'smartterode'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.