मालेगावी रुग्णालयात जमावाकडून तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 12:32 AM2020-04-20T00:32:41+5:302020-04-20T00:32:54+5:30
सामान्य रुग्णालयात उपचारार्थ आणलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या मयताच्या नातेवाइकांसह जमावाने रुग्णालयाची तोडफोड केली. यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. याप्रकरणी शहर पोलिसांत मयताच्या नातेवाइकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
मालेगाव : येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ आणलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या मयताच्या नातेवाइकांसह जमावाने रुग्णालयाची तोडफोड केली. यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. याप्रकरणी शहर पोलिसांत मयताच्या नातेवाइकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
सामान्य रुग्णालयात उपचारार्थ आणलेल्या रुग्णावर योग्य उपचार न केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत प्रत्येक रुग्णाला कोरोनाचा रुग्ण समजूनच उपचार करता असा आक्षेप घेत मयताच्या नातेवाइकांनी रुग्णालयातील आॅक्सिजन सिलिंंडर फेकण्यास सुरुवात केली.
जमवाकडून तोडफोड सुरू झाल्याने कर्मचाºयांत घबराट पसरली. ही माहिती शहर पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मयताच्या नातेवाइकांविरोधात कारवाई केली. अधिक तपास पोलीस कर्मचारी विशाल गोसावी करीत आहेत.
दरम्यान सामान्य रुग्णालयातील डॉ. शुभांगी केदारे यांनी सांगितले, सामान्य रुग्णालयात तोडफाड व डॉक्टरांना मारहाणीचे प्रकार वाढले असून, त्यामुळे कर्मचाºयांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.