अतिवृष्टीने शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
By admin | Published: August 7, 2016 10:16 PM2016-08-07T22:16:46+5:302016-08-07T22:17:11+5:30
अतिवृष्टीने शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
Next
नाशिक : नाशिकरोडच्या पूर्व भागात अतिवृष्टीमुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.
पूर्व भागातील हिंगणवेढे, कोटमगाव, सामनगाव, चाडेगाव, जाखोरी, एकलहरे आदि गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने टमाटे, कोबी, फ्लॉवर, पालेभाज्या, सोयाबीन, मका, द्राक्षबागा या पूर्णपणे उद््ध्वस्त झाल्या आहेत.
गेल्या पाच वर्षांपासून दुष्काळाने होरपळलेला शेतकरी कुठेतरी यंदा उभारी घेत असतानाच यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीमालाचे नुकसान झाल्याने तो आर्थिक संकटात सापडला आहे. त्याचबरोबर सततच्या हवामानातील गारठ्यामुळे उन्हाळी कांदा चाळीतच सडू लागला आहे.