धर्मवीर बलिदान मासानिमित्त केले सामूहिक मुंडन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:14 AM2021-03-15T04:14:03+5:302021-03-15T04:14:03+5:30
धर्मवीर संभाजी महाराजांना पकडले गेल्या क्षणापासून सतत तीस दिवस अत्यंत क्रूरपणे यातना देऊन फाल्गुन अमावस्येला मारले गेले. ते तीस ...
धर्मवीर संभाजी महाराजांना पकडले गेल्या क्षणापासून सतत तीस दिवस अत्यंत क्रूरपणे यातना देऊन फाल्गुन अमावस्येला मारले गेले. ते तीस दिवस श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळतात. धर्मवीर संभाजी महाराजांना पकडले गेल्या क्षणापासून सतत तीस दिवस अत्यंत क्रूरपणे यातना देऊन फाल्गुन अमावस्येला मारले गेले. ते तीस दिवस श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळतात. हा मास अनेक वर्षांपासून पाळण्यात येत आहे. त्याची सुरुवात रविवारी नाशिक विभागातील असंख्य धारकऱ्यांनी सकाळी रामकुंडावर एकत्र येऊन सामूहिक मुंडन करून केली.
इन्फो
असा पाळणार मास
या धर्मवीर बलिदान मासाचा प्रारंभ रामकुंडावर सामूहिक मुंडन करून करण्यात आला. त्यात सहभागी झालेला प्रत्येक धारकरी हा त्यातील प्रत्येक जण केवळ एक वेळेचे अन्नग्रहण करून, पायात पादत्राणे न घालता, कोणत्याही आनंदोत्सवात सामील न होता आपल्या छत्रपती राजाला मानवंदना देऊन कठोरपणे हे व्रत संपूर्ण ३० दिवस पाळणार आहे.
फोटो -(१४मुंडन)
धर्मवीर बलिदान मासनिमित्त सामूहिक मुंडन केलेले धारकरी.