बोगस सैन्यभरतीतील मास्टरमाइंडला अटक

By admin | Published: August 31, 2016 12:45 AM2016-08-31T00:45:40+5:302016-08-31T00:49:53+5:30

बोगस सैन्यभरतीतील मास्टरमाइंडला अटक

Mastermind arrested in bogus firing | बोगस सैन्यभरतीतील मास्टरमाइंडला अटक

बोगस सैन्यभरतीतील मास्टरमाइंडला अटक

Next

नाशिकरोड : राजस्थानच्या चौघा युवकांना बनावट कागदपत्रे व सही-शिक्के मारून आर्टिलरी सेंटरमध्ये भरती केल्याचे दाखवत फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा मास्टरमाइंड सेवानिवृत्त कर्नल सुखप्रितसिंग अर्जुनसिंग रंधवा (५९, बी-६१, सेक्टर ४०, नोएडा, उत्तर प्रदेश) यास नाशिक पोलिसांनी दिल्लीतून अटक केल्याची माहिती पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे़ या रॅकेटमधील एजंटला उपनगर पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच अटक केली होती़ दरम्यान, या प्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असून, दोनजण फरार आहेत़ राजस्थानच्या अल्वर जिल्ह्यातील बलबीर रामचंद्र गुजर, सुरेशकुमार शिवचरण महंतो, सचिनकुमार किशनसिंह, तेजपाल मोतीराम चोपडा या चौघांनी व त्यांच्या नातेवाइकांनी आर्टिलरी सेंटरमध्ये भरती होण्यासाठी एका टोळीला पैसे दिले होते. त्यांनी दिलेल्या बनावट कागदपत्र व सही शिक्क्यावरून हे चौघेजण नाशिकरोडच्या आर्टिलरी सेंटरमध्ये गेल्या जुलै महिन्यात ट्रेनिंगसाठी दाखल झाले होते. लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली असता त्यामध्ये संशय आल्याने अधिक माहिती घेण्यात आली. त्यामध्ये राजस्थानच्या चौघा युवकांनी लष्करात दाखल होण्यासाठी सादर केलेली कागदपत्रे ही बनावट असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांच्यावर उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी उपनगर पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील लष्करी शिपाई गिरीराजसिंग घनश्यामसिंग चौहान याला अटक केली होती. वरील पाचही संशयितांची न्यायालयाने मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. लष्करात भरती करण्यासाठी युवकांना खोटी कागदपत्रे व नियुक्तीपत्रे देणाऱ्या टोळीचा एजंट टेकचंद चितरराम मेघवाल (रा. मातोर, जिल्हा अल्वर, राजस्थान) याला उपनगर पोलिसांनी राजस्थानमधून ताब्यात घेतल्यानंतर त्यास न्यायालयाने ६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ दरम्यान, या बोगस सैन्यभरती करणाऱ्या रॅकेटचा मास्टरमार्इंड रंधवा पकडला गेल्याने त्यांनी किती व कशी युवकांची फसवणूक केली हे समोर येणार आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Mastermind arrested in bogus firing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.