जीवनातील पैलूंचे नैपुण्य जपावे : अरुण करमरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:16 AM2019-08-25T00:16:11+5:302019-08-25T00:16:33+5:30
मानवी जीवनाचा प्रत्येक पैलू नैपुण्यपूर्ण असल्याने समाज जीवनाच्या प्रगतीत प्रत्येक घटकाचा सहभाग असू शकतो. त्यामुळेच मानवी जीवनातील विविध पैलुंमधील नैपुण्य जपले पाहिजे, असा संदेश भारतीय समाज जीवनाच्या दर्शनातून घडत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी केले.
नाशिक : मानवी जीवनाचा प्रत्येक पैलू नैपुण्यपूर्ण असल्याने समाज जीवनाच्या प्रगतीत प्रत्येक घटकाचा सहभाग असू शकतो. त्यामुळेच मानवी जीवनातील विविध पैलुंमधील नैपुण्य जपले पाहिजे, असा संदेश भारतीय समाज जीवनाच्या दर्शनातून घडत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी केले.
नाशिक येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. मुंजे सभागृहात शनिवारी (दि.२४) संस्थेचा वार्षिक गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद कुलकर्णी व कार्यवाह हेमंत देशपांडे उपस्थित होते. अरुण करमरकर म्हणाले, भारताने १९७४ नंतर दुसरी अणुचाचणी पोखरणच्या वाळवंटात केली. या अणुचाचणीच्या निमित्ताने १९९८ पर्यंत म्हणजेच जवळपास २४ वर्षे भारतीय शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाच्या उपलब्धीसाठी पडद्याआड राहून वाट पाहिली. हाच आदर्श समोर ठेवून सर्वांनी शिक्षणाचा मूळ उद्देश समजून घेत सकारत्मक अर्थाने शिक्षणात आपले योगदान नेमके काय असू शकते याचा विचाक करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. प्रारंभी डॉ. बा. शि. मुंजे यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यातआल्यानंतर दीपप्रज्वलानाने गुणगौरव सोहळ्यास सुरुवात झाली. सावनी कुलकर्णी यांच्या ‘वंदे मातरम’ गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. संस्थेचे कार्यवाह हेमंत देशपांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद कुलकर्णी यांनी प्रमुख अतिथी अरुण करमरकर यांचा परिचय करून दिला.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
संस्थेच्या विविध विभागांतून आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा विभागात नैपुण्य मिळवणाऱ्या तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत प्रथम आलेले विद्यार्थी, पदवी व पदव्युत्तर परीक्षेत यश संपादन केलेले विद्यार्थी आणि विद्यादानाच्या कार्यात सतत कार्यरत असतानाही पीएच.डी. पदवी प्राप्त केलेल्या गुणवंत शिक्षकांसोबतच नाशिकमध्ये उद््भवलेल्या महापुरात जिवाची पर्वा न करता बचाव कार्य करणाºया शिक्षकांचा ही यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या सर्व शाळांतून प्रथम तीन क्रमांकांच्या शाळांना उपक्रमशील शाळा पुरस्काराने गौरवण्यात आले.