माता रमाई पुरस्काराने महिलांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:15 AM2021-02-10T04:15:01+5:302021-02-10T04:15:01+5:30
श्रमिकनगर येथील धम्मदूत बुद्धविहारात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून मोहन आढांगळे, सुदर्शन नगरे, वाय.डी. लोखंडे, ...
श्रमिकनगर येथील धम्मदूत बुद्धविहारात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून मोहन आढांगळे, सुदर्शन नगरे, वाय.डी. लोखंडे, प्रमोद पाटील, प्रा. डी.एम. वाकळे, पोलीस निरीक्षक किशोर मोरे, के.के. बच्छाव, बजरंग शिंदे, विनोद काळे, रवींद्र काळे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहणाऱ्या माजी नगरसेविका ज्योती शिंदे, तसेच अनुसया छबू काळे, सुनंदा बाळासाहेब शिरसाट यांना माता रमाई पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, तर अनिता गरुड वाकळेलिखित बोधिवृक्ष विशेषांक प्रकाशन आणि महिला धम्म उपासिका (बौद्धाचार्य) प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी राज्य महिला विभागाच्या सचिव वैशाली डोळस, संजय भरीत, मंदाकिनी दाणी, पी.डी. खरे, अशोक गांगुर्डे, बाळासाहेब सिरसाट, बबनराव काळे, संदेश पगारे, शांताराम पगारे, भगवान भालेराव, जगन्नाथ भरीत, शिवदास म्हसदे, शिवाजी काळे, राजू नेटावटे, वसंत पंडित आदींसह परिसरातील सर्व धम्म उपासक, उपासिकांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन भगवान भालेराव यांनी केले. पूनम आहिरे यांनी आभार मानले.
(फोटो ०९ रमाई)
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने माता रमाई पुरस्कार माजी नगरसेविका ज्योती शिंदे यांनी स्वीकारला. यावेळी मोहन आढांगळे, सुदर्शन नगरे, वाय.डी. लोखंडे, प्रमोद पाटील, प्रा. डी.एम. वाकळे, के.के. बच्छाव, बजरंग शिंदे, विनोद काळे, रवींद्र काळे उपस्थित होते.