येवला शहरात मातंग समाज मेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 07:14 PM2018-12-03T19:14:54+5:302018-12-03T19:54:05+5:30

येवला : क्र ांतीगुरु सोशल फाउंडेशन संघटनेच्या वतीने येथील महात्मा फुले नाट्यगृहात मातंग समाज मेळाव्याचे व राज्यस्तरीय क्र ांतीगुरु समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून आ

Matang Samaj Mela in Yeola City | येवला शहरात मातंग समाज मेळावा उत्साहात

राज्यस्तरीय क्र ांतीगुरु पुरस्काराचे वितरण करताना आमदार छगन भुजबळ, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, उपसभापती रु पचंद भागवत आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यस्तरीय क्र ांतीगुरु समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा

येवला : क्र ांतीगुरु सोशल फाउंडेशन संघटनेच्या वतीने येथील महात्मा फुले नाट्यगृहात मातंग समाज मेळाव्याचे व राज्यस्तरीय क्र ांतीगुरु समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार छगन भुजबळ, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जेष्ठ नेते माणिक शिंदे, पं स उपसभापती रु पचंद भागवत, जि. प. सदस्य महेंद्र काले, गायक चंदन कांबळे, जेष्ठ उद्योजक किशोर राठी, कामगार शक्तीचे अनिल सरवार, राधाकृष्ण सोनवणे, कोपरगावचे नगराध्यक्ष रवींद्र पाठक, येवला वसंत पवार, दीपक लोणारी, भारिप सिन्नरचे अध्यक्ष प्रविण जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार छगन भुजबळ यांनी वस्ताद लहुजी साळवे हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे गुरू होते. त्यांनी ज्योतिबांना संरक्षणाचे धडे दिले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लहुजी वस्ताद स्वत: लढले व त्यांनी अनेक क्र ांतिकारक घडविले म्हणून ते क्र ांतीगुरु असल्याचे सांगितले. सावित्रीबार्इंच्या शाळेत जाणाऱ्या पिहल्या मागासवर्गीय विध्यार्थीनी मुक्ता साळवे या लहुजी साळवे यांच्या नात होत्या. त्यांनी इंग्रज अधिकाºयांना उद्धेशून लिहिलेल्या निबंधाला आजही खूप महत्व आहे असेही भुजबळ म्हणाले.
अध्यक्षीय भाषणातून राजू कांबळे यांनी सकल मातंग सामाजाच्या व्यथा मांडताना सांगितले की, मातंग समाज दिवसेंदिवस भूमिहीन होत आहे. समाजावर अत्याचार होत आहेत. ही परिस्थिती बदलली नाही तर जशास तसे उत्तर दिले जाईल.
सर्व मातंग समाज संघटत झाला परंतु हक्काचं व्यासपीठ येवल्यासाठी उपलब्ध नव्हतं. समाजाचे प्रेरणास्थान लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व समाजाचा आदर्शवत इतिहास निर्माण करणारे वस्ताद लहुजी साळवे यांचे स्मारक येवल्या तालुक्यात निर्माण करण्यासाठी शासन दरबारी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे भागवत यांनी सांगितले. शासनाने दखल नाही घेतली तर स्वखर्चातून अतिशय सुंदर, सर्वांच्या माना अभिमानाने उंचावतील अशा स्मारकाची निर्मिती स्वखर्चातून करून देणार असल्याचे आश्वासन रु पचंद भागवत यांनी दिले.
प्रारंभी शिवव्याख्याते प्रा. जावेद शेख यांनी मातंग समाजाचा इतिहास सांगत समाजातील महापुरु षांविषयी माहिती देत प्रबोधन केले. यावेळी राज्यस्तरीय क्र ांतीगुरु पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रकाश लोंढे, प्रदीप सरोदे, विनोद राक्षे, चंदन कांबळे, अनिल कुंदे, दिनकरराव लांडगे, अंबादास खैरनार, संतोष आहिरे, अमोल आल्हाट, सचिन नेटारे, ज्ञानेश्वर पारखे, नामदेव साळवे, मीना शिरसाठ, बालुभाऊ आठवले, कृष्णा बडे, संजय कडनोर, सागर निकाळे आदींना यावेळी गौरविण्यात आले.
कार्यक्र म यशस्वीतेसाठी क्र ांतीगुरु सोशल फाउंडेशनचे प्रदेश उपाध्यक्ष अंकुश सोळसे, सल्लागार दिलीप सोळसे, कार्याध्यक्ष संजय तूपसैंदर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विजय दोडके, उपाध्यक्ष भागीनाथ कांबळे, कार्याध्यक्ष प्रमोद आदमाने, सरचिटणीस सुदाम कांबळे, चित्रा कांबळे, संपर्कप्रमुख वाल्मिक खैरनार, जिल्हाध्यक्ष परशराम साठे, महिला जिल्हाध्यक्ष मीरा आदमाने, येवला तालुकाध्यक्ष संजय खैरनार, महिला तालुकाध्यक्ष मालन सोळसे, शहराध्यक्ष बाळा जोगदंड, युवा तालुकाध्यक्ष राहुल पोळ, युवा शहराध्यक्ष करण आव्हाड, रावसाहेब आव्हाड, राकेश आव्हाड, आदींनी परिश्रम घेतले.

(फोटो ०३ मातंग मेळावा) दीपप्रज्वलन करताना उपस्थित मान्यवर.
(फोटो ०३ मातंग मेळावा १)
(फोटो ०३ मातंग मेळावा २)

Web Title: Matang Samaj Mela in Yeola City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक