तुल्यबळ लढती रंगणार

By admin | Published: January 28, 2017 12:57 AM2017-01-28T00:57:46+5:302017-01-28T00:57:58+5:30

रस्सीखेच : महिला आरक्षणाने निराशा

Match | तुल्यबळ लढती रंगणार

तुल्यबळ लढती रंगणार

Next

महेश गुजराथी चांदवड
पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत तालुक्यातील धोडंबे गण सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी आरक्षित झाला असून, या गणात सत्तेसाठी तुल्यबळ लढत रंगणार आहे. सर्वच पक्षाच्या वतीने आपल्या पत्नीला उमेदवारी मिळावी म्हणून पुरुष सरसावले असले तरी आतापर्यंत झेरॉक्स प्रतीच पुढे होत आहे.
या गणातील सत्ता बरेच काळ कॉँग्रेस कधी अपक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेसची असल्याने या गणात आता पाच वर्षे राष्ट्रवादीची सत्ता होती तर सन १९६५ ते १९६७ या काळात कै. दामोदर काशीराम रकिबे यांनी सभापतिपद भूषविल्यानंतर १९९४ ते १९९७ या कालावधीत दुधखेड येथील पोपटराव विष्णू पगार यांनी सभापतिपद कॉँग्रेसच्या कारकिर्दीत उपभोगले.
माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली चांगले कामकाज त्यांनी केले. २००२ ते २००५मध्ये विठाबाई सुक्राजी गायकवाड यांनी सभापतिपद भूषविले. त्यानंतर सन २००७ ते २००८ मध्ये वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अरविंद दामोदर रकिबे यांनी सभापतिपद भूषविले. त्यामुळे या धोंडबे गणाला एक वेगळा इतिहास आहे. सन २००७च्या निवडणुकीत या गटातील धोडंबे गणाचे सदस्य अरविंद रकिबे हे अपक्ष निवडून आले असताना त्यांच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडली होती. नंतर त्यांनी कॉँग्रेस पक्षात प्रवेशही केला.
धोडंबे पंचायत समिती गणात एकूण १९ गावांचा समावेश आहे. या गणाची लोकसंख्या २७ हजार ६३१ असून, या गणात धोडंबे, कानमंडाळे, शेरीसलाबन, कुंडाणे, पुरी, खेलदरी, विजयनगर, एकरुखे, दह्याने, जांबुटेक, चिखलांबे, बोराळे, शिवरे, पारेगाव, इंदिरानगर, दुधखेड, नवापूर, हट्टी, जैतापूर या गावांचा समावेश आहे.
सन २००७ च्या निवडणुकीत या गणातून अपक्ष अरविंद रकिबे हे निवडून आले. त्यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करून सभापती झाले. सभापती होऊनपण त्यांनी या गणात काही प्रमाणात विकासकामे केलीत. मात्र सर्वपक्षीयांना बरोबर घेऊन त्यांनी काम केले हा त्यांच्या कामाचा वेगळा ठसा उमटविला होता.
त्यानंतर राष्ट्रवादीकडून विद्यमान सदस्य मनीषा जाधव या निवडून आल्या. त्यांनीपण चांदवड पंचायत समितीचे उपसभापतिपद उपभोगले तरी त्यांनी बोराळे गावासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली, शिवरे ते वणी, शिवरे फाटा बोराळे ते बोराळे फाटा रस्ता डांबरीकरण, महामंडळाकडून बोराळे व शिवरे असे दोन बंधारे असे अनेक कामे केली आहेत. त्यात चांदवड पंचायत समितीत महिलाराज असल्याने त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटी चांदवड पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन झाले.

Web Title: Match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.