घोडेस्वारांकडून पदकांची लयलूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:10 AM2019-01-17T00:10:28+5:302019-01-17T00:10:48+5:30

कळवण : त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान, नेवासे व डेक्कन इक्विस्टेरियन असोसिएशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नेवासे येथे घेण्यात आलेल्या आंतरशालेय दुसऱ्या राज्यस्तरीय इक्विस्टेरियन हॉर्स रायडिंग स्पर्धेत शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वर्चस्व राखत पदकांची लयलूट केली.

Match rehearsals | घोडेस्वारांकडून पदकांची लयलूट

घोडेस्वारांकडून पदकांची लयलूट

Next
ठळक मुद्देचमकदार कामगिरीच्या जोरावर शाळेस सन्मान मिळवून देत पदक मिळविले.

कळवण : त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान, नेवासे व डेक्कन इक्विस्टेरियन असोसिएशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नेवासे येथे घेण्यात आलेल्या आंतरशालेय दुसऱ्या राज्यस्तरीय इक्विस्टेरियन हॉर्स रायडिंग स्पर्धेत शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वर्चस्व राखत पदकांची लयलूट केली.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील अकोला, पुणे, शेवगाव येथील संघांसह अनेक संघांतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. घोडेस्वारीखेळ प्रकारात नैपुण्य दाखवत सुवर्ण, रजत व कांस्य पदकांची लयलूट केली. सर्व खेळाडूंनी मिळून एकूण पन्नासपेक्षा जास्त पदके मिळविली. या सर्व विद्यार्थ्यांना दीपक पानकडे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी संघाचे शाळेचे संस्थापक डॉ. जे. डी. पवार, मीनाक्षी पवार, शैलेश पवार, अनुप पवार आदींनी यावेळी अभिनंदन
केले.प्रथमेश शिरसाठ, विवेक पटेल, वेदांत आहेर, ओम काकुळते यांच्या खेळाने प्रेक्षकांना चकित केले. तर ललित माळी, जकी शेख, कार्तिक पानसरे, वंश अग्रवाल, श्रेयश पवार, प्रसाद खैरनार, अथर्व रोजोळे, विकास शिंदे, सर्वज्ञ भालेराव व समर्थ गवळी यांनीही चमकदार कामगिरीच्या जोरावर शाळेस सन्मान मिळवून देत पदक मिळविले.

Web Title: Match rehearsals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा