जुळल्या ‘त्यांच्या’ जन्माच्या रेशीमगाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:09 AM2017-12-27T00:09:37+5:302017-12-27T00:24:07+5:30

नियतीने कोणाच्या पदरात जन्मत: व्यंग टाकले, तर काहींच्या नशिबी अपघाताने अपंगत्व आले; मात्र जिद्दीने या संकटावर मात करत जीवनाचा संघर्ष करणाºयांची संख्या समाजात मोठी आहे. त्यांनाही सर्वसामान्यांसारखा जगण्याचा हक्क असून, संसार थाटण्याच्या अपेक्षाही ते बाळगून आहेत; मात्र गरज आहे ती त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची. अशाच एका विवाहेच्छुकांच्या परिचय मंचावर तीन युवक-युवतींना एकमेकांचा जीवनासाथी लाभला आणि त्यांच्या रेशीमगाठी जुळल्या.

Matched with the silk of their 'birth' | जुळल्या ‘त्यांच्या’ जन्माच्या रेशीमगाठी

जुळल्या ‘त्यांच्या’ जन्माच्या रेशीमगाठी

Next

नाशिक : नियतीने कोणाच्या पदरात जन्मत: व्यंग टाकले, तर काहींच्या नशिबी अपघाताने अपंगत्व आले; मात्र जिद्दीने या संकटावर मात करत जीवनाचा संघर्ष करणाºयांची संख्या समाजात मोठी आहे. त्यांनाही सर्वसामान्यांसारखा जगण्याचा हक्क असून, संसार थाटण्याच्या अपेक्षाही ते बाळगून आहेत; मात्र गरज आहे ती त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची. अशाच एका विवाहेच्छुकांच्या परिचय मंचावर तीन युवक-युवतींना एकमेकांचा जीवनासाथी लाभला आणि त्यांच्या रेशीमगाठी जुळल्या.  निमित्त होते, लायन्स क्लब आॅफ नाशिक सुप्रीम व राजेंद्र पारख इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही सोमवारी (दि. २५) पार पडलेल्या अंध-अपंग व मूकबधिर विवाहेच्छुक युवक-युवतींच्या परिचय मेळाव्याचे. रोटरी सभागृहात पार पडलेल्या या परिचय सोहळ्यात तिघा युवक-युवतींना एकमेकांच्या जीवनाचा जोडीदार लाभला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. सुहास फरांदे, नंदलाल पारख, राजेंद्र पारख, धनंजय बेळे, छगाबाई पारख, लायन्स क्लबचे अध्यक्ष हंसराज देशमुुख, उद्योजक धनंजय बेळे, सचिन शहा, सतीश कोठावदे, अजय आहुजा आदी उपस्थित होते.  यावेळी फरांदे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, विवाह हा दोन कुटुंबांना जोडणारा धागा असतो. दिव्यांग युवक-युवतींमध्येदेखील एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा असते आणि तेही समाजाच्या मुख्य प्रवाहात राहून दैनंदिन जीवन जगू शकतात व तसा आत्मविश्वास त्यांनी बाळगण्याची गरज आहे.  पारख यांनी मनोगतामधून या उपक्रमाची माहिती देत सांगितले, मागील वर्षी या परिचय मेळाव्यातून २० युवक-युवतींचा विवाह जुळून आला होता.
मेळाव्यात नाशिक, नगरसह उत्तर महाराष्ट्र तसेच राज्यभरातून मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव व त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. देशमुख यांनी प्रास्ताविक, तर सतीश कोठारी यांनी सूत्रसंचालन केले. 
यांना लाभला जीवनसाथी 
मेळाव्यामध्ये भारती बाळू डोढक (ओझर) यांचा नवनाथ पाटील यांच्याशी पुष्पा जाधव (जेलरोड) यांचा चेतन पारख यांच्याशी, तर आशा शेटे (चाळीसगाव) यांचा राजन सदडे या युवकाबरोबर विवाह जुळल्याचे संयोजकांनी सांगितले. बहुतांश विवाहेच्छुकांनी पसंतीनुसार माहितीपत्रकात माहिती नोंदविली असून, या मेळाव्याच्या माध्यमातून अजून विवाह जमून येण्यास मदत होणार असल्याचे पारख म्हणाले.

Web Title: Matched with the silk of their 'birth'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक