पिंपळगाव बाजार समितीतर्फे साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 08:30 PM2020-04-16T20:30:09+5:302020-04-17T00:29:37+5:30

निफाड : तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नुकताच भिलवाडा पॅटर्ननुसार कुटुंबीयांचे सर्वेक्षण सुरू करण्यात येत असून, संपूर्ण तालुक्यात ८०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या ३७० टीम तयार करून ग्रामपंचायतनिहाय काम सुरू करण्यात आले आहे.

 Material from Pimpalgaon Market Committee | पिंपळगाव बाजार समितीतर्फे साहित्य

पिंपळगाव बाजार समितीतर्फे साहित्य

Next

निफाड : तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नुकताच भिलवाडा पॅटर्ननुसार कुटुंबीयांचे सर्वेक्षण सुरू करण्यात येत असून, संपूर्ण तालुक्यात ८०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या ३७० टीम तयार करून ग्रामपंचायतनिहाय काम सुरू करण्यात आले आहे.  या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मास्क, सॅनिटायझर, सॅनिटायझर स्प्रे, हॅण्डग्लोज आदी साहित्य निफाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्याकडे निफाड येथे बुधवारी सुपूर्द करण्यात आले. या टीममध्ये समावेश असणाºया आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेवक व सहायक हे सर्व कर्मचारी काम करीत असून, त्या कर्मचाºयांच्या सुरक्षेसाठी पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने ५५०० मास्क, १०००० हॅण्डग्लोज, ५०० मिली प्रति ५०० सॅनिटायझर स्प्रे पंप, ९० मिली सॅनिटायझर ५०० बॉटल अशा वस्तू निफाड पंचायत समितीच्या कार्यालयात गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. याप्रसंगी राजेंद्र डोखळे, सागर कुंदे, सय्यद, जावेद शेख, बंटी शिंदे, दिलीप कापसे, संदीप कराड, कैलास गादड आदी उपस्थित होते.

Web Title:  Material from Pimpalgaon Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक