थंडगार पाण्यासाठी माठ बाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 08:52 PM2021-03-08T20:52:54+5:302021-03-08T20:53:14+5:30
सायखेडा ; ऊन्हाळ्याची चाहूल लागताच गोरगरिबांचा फ्रीज म्हणून ओळखला जाणारा माठ बाजारात विक्रीसाठी जागोजागी दिसू लागला आहे.
सायखेडा ; ऊन्हाळ्याची चाहूल लागताच गोरगरिबांचा फ्रीज म्हणून ओळखला जाणारा माठ बाजारात विक्रीसाठी जागोजागी दिसू लागला आहे.
रांजण, नळ असलेला माठ, रांजणी, साधा माठ असे विविध प्रकारचे माठ सध्या विक्रीसाठी आले आहेत. वेगवेगळ्या आकार आणि प्रकारातील या माठांच्या किमतीत यंदा थोडी वाढ झाल्याचे चित्र दिसत असून, मागणी अजून वाढलेली दिसत नाही.
काही वर्षांपूर्वी, शहरात तसेच ग्रामीण भागात घरोघरी माठ दिसायचे आणि त्यातील थंडगार पाणी चवदार लागायचे; परंतु माठाची जागा आता फ्रिजने घेतली आहे, त्यामुळे शहरात व ग्रामीण भागात दिसणारे माठ कमी झाले आहेत; परंतु फ्रीजमधील पाणी चवदार लागत नसल्यामुळे माठाला मागणी वाढत आहे. आता काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे, त्यामुळे माठ बाजारात विक्रीसाठी दिसू लागले आहेत.
चौकट...
किमती थोड्याफार प्रमाणात वाढल्या आहेत. नळ असलेला माठ १५० रुपयांना तर रांजणी आता २५० ते २७० रुपयांना आहे, तसेच रांजण २५० ते ३०० रुपयांपर्यंत आहे, दरम्यान वाढत्या उन्हामुळे सध्या माठाची मागणी वाढली आहे. (०८ सायखेडा माठ)