माथाडी कामगारांचा मालेगावी संप मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:28 AM2018-05-11T00:28:02+5:302018-05-11T00:28:02+5:30
मालेगाव कॅम्प : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माथाडी कामगारांनी परवाना नूतनीकरण प्रक्रियेस विलंब व शिवार खरेदीच्या निषेधार्थ बाजार समितीचे प्रवेशद्वार बंद करून दिवसभर ठिय्या आंदोलन केले होते.
मालेगाव कॅम्प : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माथाडी कामगारांनी परवाना नूतनीकरण प्रक्रियेस विलंब व शिवार खरेदीच्या निषेधार्थ बाजार समितीचे प्रवेशद्वार बंद करून दिवसभर ठिय्या आंदोलन केले होते. सायंकाळी बाजार समिती पदाधिकारी व माथाडी कामगारांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने माथाडी कामगारांनी पुकारलेला बेमुदत संप मागे घेण्यात आला आहे. कामगारांनी बुधवारपासून बेमुदत संप सुरू केला होता. आज गुरुवारी दुसऱ्या दिवशी प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले होते. सायंकाळी बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे यांनी मध्यस्थी करत माथाडी कामगारांचे संचालक वसंत कोर, व्यापारी प्रतिनिधी भिका कोतकर यांच्याशी मागण्यांबाबत चर्चा केली. चार मागण्या मान्य करण्यात आल्यामुळे माथाडी कामगारांनी आंदोलन मागे घेतले. शुक्रवारपासून लिलाव प्रक्रिया सुरळीत होण्याची चिन्हे दिसत आहेत. या आंदोलनात माथाडी कामगार संघटनेचे राजेंद्र सूर्यवंशी, गोरख सूर्यवंशी, योगेश खैरनार आदींसह कामगार सहभागी झाले होते.