माथाडी कामगार आजपासून संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:51 AM2018-05-10T00:51:24+5:302018-05-10T00:51:24+5:30
मालेगाव : परवाना नूतनीकरण रकमेवरून मालेगाव कृउबात लिलाव प्रक्रिया सतत बंद पडत आहे. बाजार समिती प्रशासन यात लक्ष घालीत नसल्याच्या व बेकायदेशीर शिवार खरेदीच्या निषेधार्थ येथील १५० माथाडी कामगारांनी गुरुवारपासून (दि. १०) बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. या निर्णयामुळे बाजार समितीतील लाखो रुपयांची उलाढाल व लिलाव बंद राहणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून बाजार समिती प्रशासन व व्यापाऱ्यांमध्ये परवाना नूतनीकरणावरून बैठका व चर्चा होत आहे. व्यापाºयांकडून परवाने नूतनीकरण प्रक्रिया वेळेवर केली जात नाही. परवानाधारक व नूतनीकरण प्रक्रिया पार पाडलेल्या व्यापाºयांनाच लिलावात बाजार समिती सहभागी करून घेत आहे. वारंवार बाजार समितीची लिलाव प्रक्रिया बंद पडत असते. या घडामोडींमुळे माथाडी कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
यामुळे संतप्त झालेल्या १२० माथाडी कामगार व ३० व्यापाºयांकडील अशा १५० कामगारांनी उद्यापासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. शेतकºयांचे पैसे परत करणार कांदा विक्रीपोटी व्यापाºयाकडे अडकलेले शेतकºयांचे पैसे शंभर टक्के परत करू, अशी माहिती उपसभापती सुनील देवरे यांनी दिली. मुंगसे कांदा खरेदी केंद्रावरील व्यापारी शिवाजी सूर्यवंशी यांच्याकडे शेतकºयांचे तीन कोटी ४६ लाख रुपये होते. त्यापैकी एक कोटी रुपयांचे वाटप शेतकºयांना करण्यात आले आहे. उर्वरित दोन कोटी २६ लाख रुपये सूर्यवंशी यांच्याकडून वसूल करून शेतकºयांना वाटप केले जातील, असे देवरे यांनी सांगितले.