गणितज्ज्ञ दिलीप गोटखिंडीकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:19 AM2020-12-30T04:19:05+5:302020-12-30T04:19:05+5:30
दोन महिन्यांपूर्वी हृदय विकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर, पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल ...
दोन महिन्यांपूर्वी हृदय विकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर, पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर, मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी नाशिक अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यंसस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी पुष्पा गोटखिंडीकर, मुलगा अजेय, मुलगी अर्चना दीक्षित यांच्यासह सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या पेठेे हायस्कूलमध्ये अध्यापन करताना गणित विषय शिकविण्याच्या त्यांच्या कौशल्याने ते विद्यार्थीप्रिय होते. शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक संस्थांवर त्यांनी काम केले. थोर गणिततज्ज्ञ (कै.) दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर यांच्याबरोबर त्यांनी नऊ वर्षे कार्य केले. १९८४ पासून ते इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीचे ते सदस्य होते. त्याच्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ, मराठी विज्ञान परीषद अशा अनेक संस्थांवर त्यांची पदाधिकारी आणि तज्ज्ञ म्हणून काम केले. राज्य शासनाच्या भास्कराचार्य गणित नगरीचे ते संयोजक समिती सदस्य होते. त्यांनी एकूण ७० पुस्तके लिहिलेली असून, दिल्ली, कोटाबरोबरच तुर्कस्थान, फिनलँड येथे गणित आणि शिक्षणविषयक परिषदेतही त्यांचा तज्ज्ञ म्हणून सहभाग होता.