गणित-विज्ञान अध्यापक संघ अध्यक्षपदी ह्याळीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 06:16 PM2019-07-29T18:16:17+5:302019-07-29T18:17:59+5:30

तळवाडे दिगर : मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संचलित न्यू इंग्लिश स्कूल निताणे येथील राष्टÑीय छात्र सेनेचे अधिकारी व गणित विषय शिक्षक डी. बी. ह्याळीज यांची बागलाण तालुका गणित- विज्ञान अध्यापक संघाच्या अध्यक्षपदी तर काकाजी भामरे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

 Mathematics-Science Teachers Association President | गणित-विज्ञान अध्यापक संघ अध्यक्षपदी ह्याळीज

गणित-विज्ञान अध्यापक संघ अध्यक्षपदी ह्याळीज

Next

बागलाण इंग्लिश मिडिअम स्कूल सटाणा येथे शैक्षणिक वर्षातील पहिली सहविचार सभा संपन्न झाली. संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष सचिन शेवाळे यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले. बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर मावळते अध्यक्ष रमाकांत भामरे यांनी ह्याळीज व निकम यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिक्षकवृंद उपस्थित होते.

Web Title:  Mathematics-Science Teachers Association President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.