नैताळेत शुक्रवारपासून मतोबा महाराज यात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 02:34 PM2020-01-05T14:34:21+5:302020-01-05T14:34:40+5:30

नाशिक-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या नैताळे येथील आराध्य दैवत व लाखो भाविकांचे श्रध्दास्थान श्री मतोबा महाराज यांच्या यात्रोत्सवास शुक्रवार दि.१० जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. हा यात्रोत्सव दिनांक २४ जानेवारीपर्यंत सुरु रहाणार आहे.

Matoba Maharaj Yatra festival from Friday in Natal | नैताळेत शुक्रवारपासून मतोबा महाराज यात्रोत्सव

नैताळेत शुक्रवारपासून मतोबा महाराज यात्रोत्सव

googlenewsNext

लासलगाव: नाशिक-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या नैताळे येथील आराध्य दैवत व लाखो भाविकांचे श्रध्दास्थान श्री मतोबा महाराज यांच्या यात्रोत्सवास शुक्रवार दि.१० जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. हा यात्रोत्सव दिनांक २४ जानेवारीपर्यंत सुरु रहाणार आहे.
यात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी महापूजा व रथपूजा अशा धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री मतोबा महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष केदू बोरगुडे यांनी दिली. आमदार दिलीप बनकर व जिल्हा परिषद सदस्या मंदाकिनी बनकर यांच्या हस्ते महापूजा तर खासदार भारतीताई पवार व प्रवीण पवार यांच्या हस्ते रथपूजा करण्यात येणार आहे. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषेदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर,माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे ,अभिनेत्री पुष्पा ठाकूर , जिल्हा बँकेचे चेअरमन केदा आहेर, वेफकोचे अध्यक्ष चांगदेव होळकर,राजेंद्र डोखळे , निफाड पंचायत समितीच्या सभापती अनुसयाबाई जगताप, उपसभापती शिवा सुरासे ,गोदावरी बँकेच्या अध्यक्षा अमृता पवार ,जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे ,सुरेश कमानकर, डी.के.जगताप ,लासलगाव बाजार समितीच्या उपसभापती प्रीतीबोरगुडे , संचालक शिवनाथ जाधव, सुभाष कराड, मोतीराम मोगल ,भास्करराव पानगव्हाणे , वैकुंठ पाटील ,नंदलाल डागा , रमेश पालवे ,म विप्रचे संचालक सचिन पिंगळे ,नैताळेच्या सरपंच मनीषा डावखर , गटविकास अधिकारी संदीप कराड आदि उपस्थित राहणार आहेत. यात्रोत्सवामध्ये सहभागी होण्याचे आवाहन बोरगुडे यांनी केले आहे.

Web Title: Matoba Maharaj Yatra festival from Friday in Natal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.