मातोरी परिसरात गोवर, कांजण्यांची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 03:31 PM2018-04-10T15:31:38+5:302018-04-10T15:31:38+5:30
गोवर ,कांजण्याची मोठ्या प्रमाणात लागण झाली
मातोरी- वाढत्या तापमानाचा शालेय विद्यार्थ्यांवर परिणाम होत असून मातोरी ,दरी ,मुंगसरे ,मखमलाबाद, चांदसी या गावातील शालेय विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना गोवर ,कांजण्याची मोठ्या प्रमाणात लागण झाली आली. यामुळे ऐन परीक्षा कालावधीत अनेक विद्यार्थ्यांना शाळेला दांड्या माराव्या लागत आहे . परिसरात वाढत्या तापमानामुळे साथीच्या आजाराचा फैलाव झाला असून गावातील २ ते १५ वर्ष वयोगटातील मुला मुलींना कांजण्या झाल्याचे दिसून आले आहे. अशा विद्यार्थ्यांमध्ये तापाचे प्रमाण वाढते व हळूहळू त्वचेवर फोड येणे अश्या प्रकारच्या लक्षणावर प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत विटामिन च्या लसी चे लसीकरन करण्यात येत आहे. तापावरील व खाजेवरील औषधे गोळ्याचे वाटपही करण्यात येत आहे. तसेच खबरदारी म्हणून बाधीत विद्यार्थ्यांचा इतरांना संसर्ग प्रसार होऊ नये यासाठी घरीच आराम करावा असा सल्ला देण्यात येत आला. मात्र त्यामुळे परीक्षा चालू असल्याने अश्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर परिणाम होत आहे .