एक लाख गरोदर मातांना ‘मातृ वंदन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 12:04 AM2020-10-14T00:04:48+5:302020-10-14T01:11:26+5:30

नाशिक: मोलमजुरी करणाऱ्या गरोदर मातांना या काळात काम करावे लागू नये तसेच त्यांचे आर्थिक नुकसान देखील होऊ नये यासाठी राबविण्यातय येत असलेल्या ‘मातृ वंदन’ या योजनेंंतर्गत जिल्'ातील सुमारे १ लाख १९ हजार मातांना आर्थिक लाभ थेट त्याच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.

'Matru Vandan' to one lakh pregnant mothers | एक लाख गरोदर मातांना ‘मातृ वंदन’

एक लाख गरोदर मातांना ‘मातृ वंदन’

Next
ठळक मुद्देआरोग्य अभियान: टप्याटप्याने दिला आर्थिक लाभ

नाशिक: मोलमजुरी करणाऱ्या गरोदर मातांना या काळात काम करावे लागू नये तसेच त्यांचे आर्थिक नुकसान देखील होऊ नये यासाठी राबविण्यातय येत असलेल्या ‘मातृ वंदन’ या योजनेंंतर्गत जिल्'ातील सुमारे १ लाख १९ हजार मातांना आर्थिक लाभ थेट त्याच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.

रोजंदारीवर मोलमजुरीचे काम करणाºया महिलांना गरोदर काळातही आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून मुजरी करावी लागते. यातून माता आणि बाळाचे देखील कुपोषण होण्याचा धोका असतो. शिवाय अशा महिलांना अनेक शारिरीक त्रासाला सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता असते. अशा महिलांना गरोदर काळात काम करावे लागू नये आणि त्यांचे नुकसान देखील होऊ नये यासाठी मातृ वंदन योजना राबविली जात आहे. नाशिक जिल्'ात १ लाख १९ हजार ४९७ म्हणजेच जवळपास ८६ टक्के मातांना आर्थिक लाभ देण्यात आलेला आहे. गरोदर मातांना बाळाच्या जन्मापर्यंतच्या कालावधती टप्प्याटप्याने पाच हजार रूपये इतके अर्थसहाय्य केले जाते.

गरोदर मातांप्रमाणेच स्तनदा मातांसाठी देखील ‘जननी शिशू सुरक्षा योजना’ राबविली जाते. त्यानुसार गरोदार मातांची रूग्णालयात प्रसूती होण्याला प्राधान्य देण्याबरोबरच माता आणि बालक यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी योजनेचा लाभ महिलांना दिला जातो. त्यानुसार जिल्'ात स्तनदा माता आणि शुन्य ते एक वयोगटातील बालक अशा ९१ टक्के गरोदर मातांना मोफत संदर्भ सेवा देण्यात आलेली आहे.

जिल्'ात ग्रामीण तसेच अदिवासी भागातील महिलांसाठी या योजना लाभदायक ठरत आहे. या योजनांचा लाभ घेण्याविषयीच जनजागृती झाल्याचे देखील लाभार्थ्यांच्या संख्येवरून दिसून येते. महिलांची सुरक्षितेविषयी देखील यामुळे कुटूंबियांमध्ये जागृती होत असल्याचे दिसते. सुरक्षित प्रसूतीसाठी मातांना तत्काळ रूग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण देखील वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येणाºया योजनांचा लाभ घेण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येते. मात्र कामाच्या ठिकाणी महिला आणि त्यांच्या बालकांसाठी असलेल्या सुविधांच्या अंमलबजावणीबाबतची पुरेशी जनजागृती झाली नसल्याने माता-बालकांच्या आरोग्य समस्या उद्भवत असल्याचे अनेकदा समोर आले आहे.

 

Web Title: 'Matru Vandan' to one lakh pregnant mothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.