मॅट’ने दणका दिलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 06:45 PM2019-03-14T18:45:56+5:302019-03-14T18:46:27+5:30

२० फेब्रुवारी रोजी राज्याच्या महसूल मंत्रालयाने राज्यातील शेकडो उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. त्यात काही अधिकारी बदलीला पात्र नसतानाही निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा सोयीने अर्थ काढून विभागीय आयुक्तकार्यालय तसेच महसूल मंत्रालयातील अधिका-यांनी या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला

Matt's transfers of bunkers | मॅट’ने दणका दिलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

मॅट’ने दणका दिलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

Next
ठळक मुद्देउपरती : महसूल मंत्रालयाने आपलेच निर्णय फिरविले

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : निवडणूक आयोगाने निवडणुकीचे काम पाहणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांच्या नियम, निकषानुसार बदल्या करण्याचे आदेश दिलेले असताना त्यांच्या विपर्यास अर्थ काढून सोयीने बदल्यांचे प्रस्ताव तयार करून पाठविणारे विभागीय आयुक्त कार्यालय व महसूल मंत्रालयाला महाराष्टÑ प्रशासकीय न्यायाधिकरणाने सणसणीत चपराक लगावताच, बुधवारी महसूल खात्याने जवळपास सात तहसीलदार व पाच उपजिल्हाधिका-यांचे नव्याने नियुक्तीचे आदेश काढले असून, त्यात काही अधिकाºयांची प्रशासकीय कारणास्तवही बदली करण्यात आली आहे.


मॅटने दणका दिल्यानंतर बदली करण्यात आलेल्या अधिकाºयांमध्ये तहसीलदार स्वप्नील पवार (बीड), जे. डी. वळवी (बीड), डी. सी. मेंडके (जालना), गणेश राठोड (धुळे), आबा महाजन (धुळे), वैशाली हिंगे (जळगाव) व मिलिंद कुलकर्णी (जळगाव) यांचा समावेश आहे, तर उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी (जालना), लतीफ पठाण (नांदेड), सुनील यादव (लातूर) व ब्रिजेश पाटील (जालना) या चौघांचा समावेश आहे, तर जिल्हाधिकारी व निवडणूक अधिका-यांच्या प्रस्तावानेदेखील निवडणुकीच्या सोयीसाठी काही अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यात जालनाचे श्रीमती संगीता सानप व राज नंदकर या दोघांचाही समावेश आहे. महसूल मंत्रालयाने या बदल्यांचे आदेश जारी केल्यानंतर विनाविलंब या अधिका-यांनी नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे तर संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिका-यांनी त्यांना तत्काळ नियुक्तीच्या ठिकाणी रुजू करून घेण्याचे आदेश दिले आहेत. २० फेब्रुवारी रोजी राज्याच्या महसूल मंत्रालयाने राज्यातील शेकडो उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. त्यात काही अधिकारी बदलीला पात्र नसतानाही निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा सोयीने अर्थ काढून विभागीय आयुक्तकार्यालय तसेच महसूल मंत्रालयातील अधिका-यांनी या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. त्यासाठी अनेक अधिका-यांना ‘तडजोडी’साठी भाग पाडण्यात आले. त्यामुळे साहजिकच काही प्रामाणिक अधिकाºयांची गैरसोय झाल्यानंतर त्यांनी थेट मॅटमध्ये धाव घेतली होती. मॅटनेदेखील त्याची दखल घेत बाजू ऐकून घेण्याबरोबरच महसूल मंत्रालयाला गैरसोयीच्या व चुकीच्या बदल्या केल्याबद्दल धारेवर धरून ताश्ोरे ओढले होते. त्यामुळे अन्याय झालेल्या अधिका-यांच्या सोयीनुसार बदल्या करण्याचे आदेश महसूल खात्याला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार बुधवारी महसूल विभागाने या अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून, त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे.

Web Title: Matt's transfers of bunkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.