मौजे सुकेणे गाव झाले कोरोनामुक्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 09:04 PM2020-06-02T21:04:51+5:302020-06-03T00:09:26+5:30
कसबे सुकेणे : मौजे सुकेणे येथील बाधित दांपत्याने कोरोनावर मात केली. मंगळवारी (दि. २) त्यांना लासलगाव उपजिल्हा रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. कसबे सुकेणे येथील आरोग्य यंत्रणा आणि मौजे सुकेणे गावकऱ्यांनी या दांपत्याचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

मौजे सुकेणे येथे मुंबईहून आलेल्या युवकाला व त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर लासलगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. दहा दिवसाच्या उपचारांनंतर दोघांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना मंगळवारी घरी सोडण्यात आले.
यावेळी कसबे सुकेणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील, मौजे सुकेणेचे सरपंच सुरेखा चव्हाण, उपसरपंच सचिन मोगल, संजय मोगल, संदीप राहणे, अशोक मोगल, नानासाहेब मोगल, उत्तम देशमुख यांच्यासह ग्रामस्थ आणि आरोग्य कर्मचारी, आशा सेविका उपस्थित होते.
बाणगंगा पुल खुला
मौजे सुकेणे येथे कंटेन्मेंट झोन असल्याने येथील बाणगंगा नदीवरील पूल अत्यावश्यक सेवांसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे प्रमुख जिल्हामार्ग असलेल्या कोकणगाव-सुकेणे-चांदोरी रस्त्याची वाहतूक सुरळीत होऊन नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान मंगळवारी सकाळी प्रांताधिकारी अर्चना पठारे यांनी भेट देऊन कंटेन्मेंट झोनची पाहणी केली. पाहणीत झोनमधील काही दुकाने सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.