देहविक्रीसाठी तस्करी क रणारी मुख्य संशयित बांगलादेशी पीडित मुलीची मावशी फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 11:52 PM2017-12-17T23:52:41+5:302017-12-18T00:18:20+5:30
बांगलादेशातून भारत फिरविण्याच्या बहाण्याने स्वत:च्या बहिणीच्या मुलीला दलालांमार्फत भारतात पाठवून देहविक्रीसाठी तस्करी क रणारी मुख्य संशयित माजिदा अब्दूल ही महिला अद्याप फरार आहे.
नाशिक : बांगलादेशातून भारत फिरविण्याच्या बहाण्याने स्वत:च्या बहिणीच्या मुलीला दलालांमार्फत भारतात पाठवून देहविक्रीसाठी तस्करी क रणारी मुख्य संशयित माजिदा अब्दूल ही महिला अद्याप फरार आहे.
भारत-बांगलादेश सीमेवरून अल्पवयीन मुलींची तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार पीडित मुलीने प्रसारमाध्यमांपुढे नाशिकमध्ये बोलताना स्पष्ट केला. यावेळी त्या मुलीने पंधरा ते वीस अल्पवयीन मुलींना नोकरी व घरांमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून तिच्यासोबत भारतात आणले गेल्याची माहिती दिली. यापैकी पीडित मुलीला नाशिकच्या रेल्वेस्थानकापर्यंत दलालाने पोहचविले व उर्वरित मुली शहरातील वासनेच्या बाजारापर्यंत पोहचविल्या गेल्या किंवा त्यांचा कुठे सौदा केला गेला, याबाबत अद्याप कु ठलीही माहिती पोलिसांना हाती लागलेली नाही. एकूणच आंतरराष्टÑीय स्तरावर या व्यापारासाठी मानवी तस्करीचे हे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी राष्टÑीय स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे तसेच राज्यातील सुरक्षा यंत्रणेनेही विविध शहरांमध्ये रुजलेली पाळेमुळे उखडून काढण्याची मागणी हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार देवयानी फरांदे, जयवंतराव जाधव यांनी केली आहे. पिटा कायद्यान्वये सिन्नर तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील देहविक्रीचा अड्डा सील करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिक ाºयांकडे पोलिसांनी पाठविला आहे; मात्र याबाबत अद्याप कुठलीही कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही.