कादवा नदीत बुडून मावशी-भाचीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 12:46 AM2018-01-03T00:46:07+5:302018-01-03T00:48:20+5:30
दिंडोरी : सुई-पोत विकून पोट भरण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातून आलेल्या मावशी व भाचीचा अवनखेड येथे कादवा नदीत बुडून मृत्यू झाला बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा येथून ताईबाई जानराव शिवरकर (४५) व लता राजू हटकर (२५) या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर फाटा येथे कुटुंबासह आल्या होत्या.
दिंडोरी : सुई-पोत विकून पोट भरण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातून आलेल्या मावशी व भाचीचा अवनखेड येथे कादवा नदीत बुडून मृत्यू झाला बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा येथून ताईबाई जानराव शिवरकर (४५) व लता राजू हटकर (२५) या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर फाटा येथे कुटुंबासह आल्या होत्या. तेथे रस्त्याच्या कडेला पाल टाकून राहत होत्या. दिवसभर सुया-पोत आदी साहित्य विक्रीसाठी परिसरातील घरोघरी जात. मंगळवारी सकाळी गेलेल्या त्या सायंकाळपर्यंत परत न आल्याने नातेवाइकांनी परिसरात शोध घेतला. त्यावेळी अवनखेड येथे परमोरीच्या बाजूने त्यांच्या चप्पला कादवा नदीतीरी आढळून आल्या. त्यावरून त्या पाण्यात बुडाल्याचा संशय आला.
दिंडोरी पोलिसांना याबाबत खबर देण्यात आली. पोलीस हवालदार एम. के. दहीवडकर, टी. बी. जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नातेवाईक व
ग्रामस्थांच्या मदतीने ग्रामस्थ चंदू वामन बेंडकुळी यांनी पाण्यात शोध घेतला असता त्यांनी एकीचा मृतदेह पाण्यातून काढला. यानंतर काही वेळाने दुसराही मृतदेह शोधण्यात यश आले. मयत लता हीस अवघ्या दहा महिन्यांची मुलगी असून, या घटनेने नातेवाइकांनी एकच आक्र ोश केला.
पोलिसांनी पंचनामा करत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. दिंडोरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एम. के. दहीवडकर, टी. बी. जाधव हे करीत आहेत.