सुनंदाच्या यशाने चंद्रमौळी झोपडीत मावेना आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:11 AM2021-07-18T04:11:18+5:302021-07-18T04:11:18+5:30
इगतपुरी तालुक्यातील पत्र्याचीवाडी (त्रिंगलवाडी) म्हणजे संपूर्ण आदिवासी ठाकर समाजाची वस्ती असलेली वाडी. सुनंदाचं घर म्हणजे चंद्रमौळी झोपडी. ...
इगतपुरी तालुक्यातील पत्र्याचीवाडी (त्रिंगलवाडी) म्हणजे संपूर्ण आदिवासी ठाकर समाजाची वस्ती असलेली वाडी. सुनंदाचं घर म्हणजे चंद्रमौळी झोपडी. ना वीज ना अभ्यास करण्यासाठीचं पोषक वातावरण. परंतु जन्मजात तल्लख बुद्धिमत्ता असलेल्या सुनंदाची जिद्द व चिकाटी हेरून शिक्षक दत्तात्रय दातीर यांनी सुनंदाचा चौथीपासून पुढील शिक्षणासाठीचा खर्च स्वत: करण्याचा निर्णय घेतला. इयत्ता पाचवीपर्यंतचं शिक्षण पत्र्याचीवाडी येथे पूर्ण करून दातीर यांच्या मार्गदर्शनाने ती महात्मा गांधी हायस्कूल इगतपुरी येथे इयत्ता सहावीत दाखल झाली. इथेही इयत्ता सहावीपासून नववीपर्यंत तिने प्रथम क्रमांक सोडला नाही. इयत्ता नववीत सुनंदाने ९६ टक्के गुण मिळविले होते. आता दहावीत ९८.६० गुण मिळवून ती तालुक्यात प्रथम आली आहे.
--------------
आयएएस होण्याचे स्वप्न
सुनंदाचं भारतातल्या नामांकित अशा संस्थेमधून आयआयटी करून नंतर आयएएस बनण्याचं स्वप्न आहे. याकामी तिच्या पंखांना बळ देण्याचं काम दातीर दाम्पत्य करीत आहे. दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच सुनंदाने जेईईची तयारी करणाऱ्या नाशिकमधील एका नामांकित कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतला असून, तिची जेईईची तयारी चालू आहे.
(१७ आहुर्ली)
170721\17nsk_8_17072021_13.jpg
१७ आहुर्ली