दिंडोरीपेक्षा नाशिक मतदारसंघात प्रचारात सर्वाधिक खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 06:05 PM2019-04-19T18:05:55+5:302019-04-19T18:11:16+5:30
नाशिक मतदारसंघात १८ उमेदवार रिंगणात असले तरी, त्यातही प्रमुख लढत हेमंत गोडसे, समीर भुजबळ, पवन पवार व माणिकराव कोकाटे या चौघांमध्ये आहे. उमेदवारांनी आपल्यापरीने प्रचारात आघाडी घेतली असून, त्यासाठी येणाºया खर्चाचा तपशील आयोगाला सादर केला आहे. त्यात कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार समीर
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार दुसऱ्या टप्प्यात पोहोचला असून, उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून उमेदवारांना त्यांच्या प्रचारावर केला जात असलेला खर्च सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात उमेदवारांनी प्रचारावर केलेला खर्च पाहिल्यास ग्रामीण भागातील प्रचारापेक्षा शहरी भागातच उमेदवारांना अधिक खर्च करावा लागला आहे. नाशिक मतदारसंघातील सर्व प्रमुख उमेदवारांचा खर्च लाखाच्या घरात असून, दिंडोरीतही अशीच परिस्थिती आहे, परंतु नाशिकच्या उमेदवारांपेक्षा त्यांचा खर्च कमी आहे.
नाशिक मतदारसंघात १८ उमेदवार रिंगणात असले तरी, त्यातही प्रमुख लढत हेमंत गोडसे, समीर भुजबळ, पवन पवार व माणिकराव कोकाटे या चौघांमध्ये आहे. उमेदवारांनी आपल्यापरीने प्रचारात आघाडी घेतली असून, त्यासाठी येणाºया खर्चाचा तपशील आयोगाला सादर केला आहे. त्यात कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी २० लाख ७३ हजार ७२० खर्च केला आहे, त्या खालोखाल अपक्ष माणिकराव कोकाटे यांनी १३ लाख २४ हजार ९५६ रूपये तर युतीचे हेमंत गोडसे यांनी ११ लाख, ४८ हजार ९३७ रूपये खर्च केला आहे. अन्य उमेदवारांनी सरासरी २५ हजार रूपये खर्च केला आहे. तर विनोद शिरसाठ व सिंधुबाई केदार या दोघांनी खर्चच सादर केलेला नाही. दिंडोरी मतदारसंघातून ८ उमेदवार नशीब अजमावित असून, त्यातील युतीच्या भारती पवार यांचा खर्च सर्वाधिक आहे. त्यांनी पहिल्या टप्प्यात ७लाख, ४४ हजार ९२२ रूपये खर्च केले असून, त्या खालोखाल माकपाचे उमेदवार जिवा पांडू गावित यांनी ५ लाख, १४ हजार ७५१, तर आघाडीचे धनराज महाले यांनी ३ लाख, ५० हजार ५३१ रूपये खर्च केले आहेत. अपक्ष उमेदवारांमध्ये सर्वाधिक खर्च टी. के. बागुल यांनी दीड लाख रुपये केला आहे.
नाशिक मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघ शहरातीलच आहेत. अन्य तीन मतदारसंघ शहरी, ग्रामीण असे संमिश्र मतदारांचा समावेश आहे. दिंडोरी मतदारसंघ पूर्णत: ग्रामीण असून, त्याचा विस्तारही मोठा आहे. असे असूनही तेथून उमेदवारी करणाºया उमेदवारांचा निवडणूक प्रचारावरील खर्च कमी आहे. त्यामानाने शहरी मतदारसंघात उमेदवारांना निवडणूक खर्च अधिक करावा लागत आहे. अजून प्रचाराचे आठ दिवस शिल्लक आहेत.