कमाल तपमान घसरले; वाºयाचा वेग वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 12:52 AM2017-12-06T00:52:25+5:302017-12-06T00:55:55+5:30
नाशिक : मागील चार दिवसांपासून शहराचे किमान तपमान वाढत असून, कमाल तपमान मात्र घसरू लागल्याने वातावरणात गारवा जाणवू लागल्याचे हवामान निरीक्षकांचे म्हणणे आहे. कमाल तपमान मंगळवारी अवघे १९ अंश इतके नोंदविले गेले. एकूणच कमाल तपमानात झालेली घट आणि ओखी वादळामुळे वाढलेल्या वाºयाच्या वेगाने दिवसभर गारठा जाणवत होता. शहरात दिवसभर ताशी १४ किलोमीटर या वेगाने वारा वाहत असल्याची नोंद करण्यात आली.
नाशिक : मागील चार दिवसांपासून शहराचे किमान तपमान वाढत असून, कमाल तपमान मात्र घसरू लागल्याने वातावरणात गारवा जाणवू लागल्याचे हवामान निरीक्षकांचे म्हणणे आहे. कमाल तपमान मंगळवारी अवघे १९ अंश इतके नोंदविले गेले.
एकूणच कमाल तपमानात झालेली घट आणि ओखी वादळामुळे वाढलेल्या वाºयाच्या वेगाने दिवसभर गारठा जाणवत होता. शहरात दिवसभर ताशी १४ किलोमीटर या वेगाने वारा वाहत असल्याची नोंद करण्यात आली.
‘ओखी’ मुंबईपासून पश्चिमेला ३०० किलोमीटर आणि सुरतेपासून दक्षिणेला ४८० किलोमीटरवरून पुढे वेगाने सरकत असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने मंगळवारी वर्तविला. उत्तर महाराष्टÑातील समुद्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा सुटल्याने समुद्र खवळला असून, मासेमारी करणाºयांनादेखील समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या थंडीबरोबरच रिमझिम पावसामुळे गारवा वाढल्याने नेहमीच गजबजणाºया रस्त्यावर आणि बाजारात वर्दळ कमी झाली होती. तर ठिकठिकाणी दिवसभर शेकोट्या पेटल्याचे चित्र दिसून आले.दिवसाही वाहनांचे
दिवे सुरू दुचाकी-चारचाकी वाहनचालकांनी रिमझिम पाऊस, ढगाळ हवामानामुळे रस्त्यांवरून मार्गक्रमण करताना वाहनाचे मुख्य दिव्यांसह ‘पार्किंग इंडिकेटर’ सुरू करण्याची खबरदारी प्रवासादरम्यान घेतल्याचे दिसून आले. दाट ढगाळ हवामानामुळे दिवसभर अंधूक प्रकाश व रिमझिम पावसामुळे रस्ता दिसेनासा झाला होता. त्यामुळे वाहनांचे दिवे सुरू करून बहुसंख्य वाहनचालकांनी वाहतूक करणे पसंत केले.