कोट्यवधीची माया गोळा : एजंट आत्महत्येच्या मानसिकतेत सामाजिकतेच्या बुरख्याआड ‘गायत्री मार्केटिंग’चा ‘धंदा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 01:14 AM2017-11-13T01:14:04+5:302017-11-13T01:15:01+5:30

सुलभ हप्त्याने दुचाकी व लकी ड्रॉच्या माध्यमातून एलएडी दूरदर्शन संच देण्याचे आमिष दाखविणाºया ‘गायत्री मार्केटिंग’ कंपनीच्या आयोजकांनी समाजकल्याणासाठीच सारे काही करत असल्याचा बनाव रचल्याचे स्पष्ट

Maya collects billions of billions: Agent's 'mental health' mentality 'social work' Gayatri marketing 'business' | कोट्यवधीची माया गोळा : एजंट आत्महत्येच्या मानसिकतेत सामाजिकतेच्या बुरख्याआड ‘गायत्री मार्केटिंग’चा ‘धंदा’

कोट्यवधीची माया गोळा : एजंट आत्महत्येच्या मानसिकतेत सामाजिकतेच्या बुरख्याआड ‘गायत्री मार्केटिंग’चा ‘धंदा’

Next
ठळक मुद्देसमाजावर छाप पाडण्यात यशस्वीपैशासाठी तगादा लागू लागल्याने अवस्था बिकट जमा केलेल्या कोट्यवधी रुपयांची उधळण

नाशिक : सुलभ हप्त्याने दुचाकी व लकी ड्रॉच्या माध्यमातून एलएडी दूरदर्शन संच देण्याचे आमिष दाखविणाºया ‘गायत्री मार्केटिंग’ कंपनीच्या आयोजकांनी समाजकल्याणासाठीच सारे काही करत असल्याचा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले असून, सभासदांचा विश्वास संपादन करण्यासाठी अनाथ मुलांना वस्तू वाटपाचे कार्यक्रम घेत समाजावर छाप पाडण्यात ही मंडळी यशस्वी झाल्याने त्यातून कोट्यवधींची माया गोळा करण्यात आली आहे. दरम्यान, ज्या एजंटांनी सभासद गोळा करून दिले, त्यांच्याकडे पैशासाठी तगादा लागू लागल्याने त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.
गायत्री मार्केटिंग कंपनीच्या आयोजकांनी एकीकडे समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा आभास निर्माण करण्याचा, तर दुसरीकडे गोरगरिबांना गंडविण्याचा प्रकार केला आहे. त्यांच्या या दुटप्पी भूमिकेचा आता उलगडा झाला आहे. समाजातील तळागाळातील जनतेसाठी गायत्री मार्केटिंग काम करीत असल्याचे भासविण्यासाठी अभिक्षण गृह, अनाथाश्रम, ग्रामीण भागातील शाळा, वृद्धाश्रमात फळे वाटप, शालेय वस्तुंचे वाटप, अन्नदान असे कार्यक्रम राबविले, या कार्यक्रमांचे छायाचित्रांचे अल्बम काढून ते समाजापुढे ठेवले. गोरगरिबांसाठी काम करणाºया गायत्री मार्केटिंगकडून फसवणूक होणार नाही अशी छाप टाकण्यात ते यशस्वी झाले, परिणामी त्यांच्या जाळ्यात सभासद अलगद फसले आहेत. नाशिकरोडच्या मालधक्क्यावर काम करणारे जवळपास दीडशे हमाल याच आमिषाला बळी पडले व त्यांनी लकी ड्रॉ योजनेत सहभाग नोंदविला आहे. नाशिक शहरात राबविलेल्या लकी ड्रॉ योजनेच्या माध्यमातून जमा केलेल्या कोट्यवधी रुपयांची उधळण करताना आयोजकांनी आपल्या मूळ गावी बंगले, इमारती बांधल्याची तक्रार आता सभासद करू लागले आहेत. महागडे भ्रमणध्वनी, फर्निचर, आलिशान गाड्या त्यांनी खरेदी केल्या आहेत. लकी ड्रॉ योजनेची मुदत संपल्यामुळे सभासदांनी गायत्री मार्केटिंगकडे तगादा लावला असता, त्यांना धमकाविण्याचे प्रकार केले जात असल्याची तक्रार केली जात आहे. काही सभासदांनी पोलिसांत जाण्याची धमकी दिली असता, ‘पोलिसात तक्रार केली, तर पैसे मिळणार नाहीत’ असे आयोजकांकडून सांगण्यात आल्यामुळे चार महिने उलटूनही कोणीच तक्रारीसाठी पुढे आले नसल्याचे सभासदांचे म्हणणे आहे. 

Web Title: Maya collects billions of billions: Agent's 'mental health' mentality 'social work' Gayatri marketing 'business'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.