नाशिकच्या माया सोनवणेने सामना गाजवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2022 01:18 AM2022-04-20T01:18:11+5:302022-04-20T01:19:04+5:30

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)तर्फे आयोजित वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत नाशिकच्या माया सोनवणेने पुदुचेरी येथे आंध्रपाठोपाठ केरळ विरुद्धही ४ बळी घेऊन आपल्या भेदक फिरकीने सामना गाजवला. दुसऱ्या सामन्यात केरळ विरुद्ध मायाने चार षटकात केवळ १२ धावा देत ४ बळी घेतले. यात १२ निर्धाव चेडूंचा समावेश होता.

Maya Sonawane of Nashik won the match | नाशिकच्या माया सोनवणेने सामना गाजवला

नाशिकच्या माया सोनवणेने सामना गाजवला

googlenewsNext

नाशिक : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)तर्फे आयोजित वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत नाशिकच्या माया सोनवणेने पुदुचेरी येथे आंध्रपाठोपाठ केरळ विरुद्धही ४ बळी घेऊन आपल्या भेदक फिरकीने सामना गाजवला. दुसऱ्या सामन्यात केरळ विरुद्ध मायाने चार षटकात केवळ १२ धावा देत ४ बळी घेतले. यात १२ निर्धाव चेडूंचा समावेश होता. सर्वाधिक ३० धावा करणाऱ्या केरळची कर्णधार एस. सजनाला त्रिफळाचीत करून मायाने सामना महाराष्ट्राच्या बाजूने फिरविला. या गोलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने केरळला ९० धावात रोखले. शिवाय ५ बाद ६५ या स्थितीत, सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन नाबाद ५ धावा करताना महाराष्ट्राला १८ व्या षटकात, दोन गडी राखून विजयी करण्यात माया सोनवणेने मोलाचा हातभार लावला.

याआधी पहिल्या सामन्यात देखील आंध्र विरुद्ध अतिशय प्रभावी गोलंदाजीचे प्रदर्शन केले होते. मायाने चार षटकात ३२ धावात ४ बळी घेतले. यात ९ निर्धाव चेडूंचा समावेश होता. आंध्रच्या ७३ धावांच्या सलामीनंतर मायाने दोन्ही फलंदाजांना त्याच धावसंख्येवर तंबूत पाठविले. त्यामुळे आंध्रला १३६ धावात रोखण्यात महाराष्ट्राला यश आले. पण आंध्रने महाराष्ट्राला ९ बाद ९५ असे रोखल्यामुळे वरिष्ठ महिला महाराष्ट्र संघ पहिल्या सामन्यात पराभूत झाला. वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेतील, महाराष्ट्राचे बाकी सामने पुढीलप्रमाणे होणार आहेत - २१ एप्रिल मेघालय, २२ एप्रिल हैदराबाद व २४ एप्रिल राजस्थान विरुद्ध. (फोटो १९ सोनवणे)

Web Title: Maya Sonawane of Nashik won the match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.